नवी दिल्ली: नेपाळचे माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' ( Former Nepal Prime Minister Pushpa Kamal Dahal ) यांनी रविवारी येथील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुख्यालयात पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट ( BJP President JP Nadda meets former Nepali PM Prachanda ) घेतली. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या पक्ष आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
नड्डा यांच्या निमंत्रणावरून कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे अध्यक्ष प्रचंड हे भारत दौऱ्यावर आले आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे देखील चर्चेचा भाग होते. नड्डा म्हणाले, 'आम्ही भारत आणि नेपाळमधील परस्पर संबंध मजबूत आणि दृढ करण्यावर फलदायी चर्चा केली, विशेषत: आमच्या जुन्या सांस्कृतिक आणि दोन्ही देशांतील लोकांच्या पातळीवर तसेच पक्ष पातळीवर सहकार्य पुढे नेण्याच्या मार्गांवरही आम्ही चर्चा केली.