महाराष्ट्र

maharashtra

J P Nadda tenure extend भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डांना मुदतवाढ, अमित शाहांनी दिली माहिती

By

Published : Jan 17, 2023, 4:51 PM IST

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना राष्ट्रीय कार्यकारी समितीने मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रीय कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर अमित शाह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जे पी नड्डा हे जून 2024 पर्यंत भाजपाध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत.

J P Nadda term extend
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा

नवी दिल्ली - भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीने भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जे पी नड्डा हे जून 2024 पर्यंत भाजपाध्यक्ष पदावर कायम राहणार आहेत. याबाबतची घोषणा भाजपच्या कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी जे पी नड्डा यांच्या मार्गदर्शनाखालीच होणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

भाजपची विजयाची घोडदौडभाजपच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यापासून भाजपने अनेक महत्वाच्या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकारी समितीने त्यांच्यावर पक्षाच्या कामाची जबाबदारी टाकत पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांच्या व्युहचनेची तयारीही जे पी नड्डा यांच्या देखरेखीखालीच होणार आहे. त्यामुळे जे पी नड्डा यांना दिलेल्या मुदतवाढीला महत्व प्राप्त झाले आहे.

अमित शाह यांच्यानंतर विजयाची परंपराभाजपचे तत्कालिन अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शाह यांना केंद्रात गृहमंत्री केल्यानंतर पक्षाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता भाजपसह देशातील इतर पक्षांच्या नेत्यांनाही लागली होती. मात्र जे पी नड्डा यांच्या खांद्यावर भाजपने पक्षाध्यपदाची धुरा सोपवली. त्यानंतर जे पी नड्डा यांनीही पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर अनेक महत्वाच्या निवडणुकीत विजय संपादन केला आहे. अमित शाह यांची विजयाची परंपरा जे पी नड्डा यांनीही सुरू ठेवली आहे.

मोदी शहांचे विश्वासूजे पी नड्डा यांच्या खांद्यावर पक्षाध्यक्षपदाची धुरा आल्यापासून भाजपने विजयाची परंपरा सुरूच ठेवली आहे. जे पी नड्डा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे खास विश्वासू मानले जातात. त्यामुळेही त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याची चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली आहे. दरम्यान भाजप आतापासूनच विधानसभा आणि लोकसभेच्या तयारीला लागल्याचे जे पी नड्डा यांना मुदतवाढ दिल्यावरुन दिसत आहे.

हेही वाचा - Rahul Gandhi on Varun Gandhi: वरुणची आणि माझी विचारधारा वेगळी.. मी संघाच्या कार्यालयात जाऊ शकत नाही: राहुल गांधी

ABOUT THE AUTHOR

...view details