नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांना रविवारी भापपच्या कार्यालयात सुरक्षा ठेवायची असेल तर पहिली पसंती अग्निपथ योजनेत भरती झालेल्या जवानांना दिली पाहिजे असे वक्तव्य केल्याने मोठा गदारोळ सुरू झाला आहे. त्यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर विजयवर्गीय यांनी आरोप केला की 'टूलकिट' गँगशी संबंधित लोक आपल्या विधानाचा विपर्यास करून 'कर्मवीरांचा' अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत असही ते म्हणाले आहेत.
विजयवर्गीय यांनी इंदूर येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले की, सैन्याच्या प्रशिक्षणात शिस्त आणि आज्ञाधारकता या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असून अग्निपथ योजनेंतर्गत सेवेदरम्यान युवकांमध्ये हे दोन्ही गुण विकसित होतील. ते म्हणाले की, जेव्हा एखादा युवक अग्निपथ योजनेंतर्गत सैन्यात प्रशिक्षण घेतो आणि चार वर्षे सेवा करून निघून जातो, तेव्हा त्याच्या हातात 11 लाख रुपये असतील आणि तो अग्निवीरचा टॅग छातीवर लावून फिरेल. तसेच, पुढे म्हणाले भाजपच्या या कार्यालयात मला सुरक्षा ठेवायची असेल, तर मी अग्निवीरांना प्राधान्य देईन अस ते म्हणाले आहेत. याच वक्तव्यावरून देशभर गोंधळ निर्माण झाला आहे.