महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonali Phogat Case सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवा खुलासा, दोन सहकऱ्यांनी बळजबरीने पाजले विषारी ड्रिंक - अमली पदार्थाच्या सोनाली फोगाटाचा मृत्यू

सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवीन खुलासा Sonali Phogat Death Case समोर आला आहे. सोनाली फोगटचे दोन सहकारी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांनीच तिला बळजबरीने गोव्यातील एका क्लबमध्ये बळजबरीने ड्रिंक पाजले व त्यामध्ये त्यांनी विषारी रसायन टाकले असल्याची माहिती गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे.

Sonali Phogat Case
Sonali Phogat Case

By

Published : Aug 26, 2022, 2:49 PM IST

Updated : Aug 26, 2022, 3:54 PM IST

गोवा - सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी नवीन खुलासा Sonali Phogat Death Case समोर आला आहे. सोनाली फोगाटचे दोन सहकारी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांनीच तिला बळजबरीने गोव्यातील एका क्लबमध्ये बळजबरीने ड्रिंक पाजले व त्यामध्ये त्यांनी विषारी रसायन टाकले असल्याची माहिती गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.

प्रतिक्रिया देताना गोव्याचे आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई

आरोपींना बळजबरीने पाजले सोनालीला ड्रिंक - दोन्ही आरोपी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. एफएसएलच्या तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. अधिक चौकशीसाठी, आरोपींना पुढील पुरावे मिळविण्यासाठी पथकासह विविध ठिकाणी पाठवले जाईल, अशी माहिती गोवा आयजीपी यांनी दिली आहे.

गोवा आयजीपी म्हणाले की, व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की एका आरोपीने सोनालीला जबरदस्तीने ड्रिंक सेवन करायला लावले. आरोपी सुखविंदर सिंग आणि सुधीर सांगवान यांनी कबुली दिली की त्यांनी जाणूनबुजून विषारी रसायन त्या ड्रिंकमध्ये मिसळले आणि तिला ते प्यायला लावले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे असे दिसून आले की कथित सुधीर सांगवान आणि त्याचा सहकारी सुखविंदर सिंग हे एका क्लबमध्ये सोनालीसोबत पार्टी करत होते. त्यांच्यापैकी एकाने सोनालीला बळजबरीने ड्रिंक सेवन करायला लावल्याचे एका व्हिडिओमध्ये दिसून आले आहे, अशी माहिती गोवा आयजीपी ओमवीर सिंग बिश्नोई यांनी दिली आहे.

सोनाली फोगाट शवविच्छेदन अहवाल - भाजपा नेत्या सोनाली फोगाट मृत्यूबाबत गुरुवारी Sonali Phogat Case PM report एक नवीन माहिती पुढे आली होती. सोनालीच्या शवविच्छेदन अहवालात तीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. या संदर्भातील माहिती गोवा मेडिकल कॉलेजचे डीन शिवानंद बांदेकरांनी दिली होती. तर सोनालीच्या मृत्यूबाबत पोलिसांनी योग्य तपास करण्याची मागणी तिच्या कुटुंबाने केली होती.

कुटुंबियांचा गंभीर आरोप - सोनाली फोगाट यांचा मृत्यूपूर्वी बलात्कार व खून करण्यात आल्याचा आरोप sonali Phogat rape murder allegation त्यांच्या कुटुंबीयांनी सोनालीचे सहकारी सुधीर सागवांन आणि सुखविंदर यांच्यावर केला होता. तसेच त्यांनी याविषयीची तक्रार बुधवारी अंजुना पोलीस स्थानकात Anjuna Police Station देखील केली होती. यावेळी त्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यापूर्वी या दोन्ही संशयितांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. Sonali Phogat murder case

दोघांवर हत्येचा गुन्हा दाखल - सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अंजुना पोलिसांनी तिच्यासोबत गोव्याला गेलेल्या सुधीर पाल व सुखविंदर संगवान या दोन जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी सकाळी फोगट यांचे निधन झाले होते. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. आयपीसी 302 अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी दोन सहकारी पोलिसांच्या ताब्यात - भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी Sonali Phogat death case गोवा पोलिसांनी फोगट यांचे सहकारी सुधीर पाल व सुखविंदर संघवान यांना ताब्यात घेतले associate PA Sudhir Sagvan called questioning to Anjuna police होते. गुरुवारी संध्याकाळी फोगट यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला Sonali Phogat PA Sudhir Sagvan questioning. त्यानुसार त्यांच्या शरीरावर जखमेचे व्रण आढळून आले होते. बुधवारी फोगट यांच्या कुटुंबियांनी या दोन्ही सहकाऱ्यांविरोधात बलात्काराचा व खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा -Sonali Phogat Case सोनाली फोगाटच्या मृतदेहावर आढळून आले जखमेचे निशाण, शवविच्छेदन अहवालात झाले स्पष्ट

Last Updated : Aug 26, 2022, 3:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details