शिवसागर (आसाम) -काँग्रेसने 70 वर्षात काय केले, असा सवाल भाजपा नेत्यांकडून सतत केला जातो. यावर आज छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी उत्तर दिलं. तसेच त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. सत्तेत असताना काँग्रेसेन देशातील ऐक्य बळकट केले आणि विविध जाती, धर्मातील लोकांना एकत्र आणलं, असे उत्तर भूपेश बघेल यांनी दिलं आहे. आसाममध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेला ते संबोधीत करत होते. यावेळी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधींही उपस्थित होते.
स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून दोन विचारधारा राहिल्या आहेत. एक म्हणजे विभाजन आणि दुसरे जे एक्य ठेवणे. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा, हे धोरण लागू केले. तर दुसरीकडे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात कामगार, शेतकरी, महिला आणि तरुणांनी एकत्र येत इंग्रजांना तोंड दिले, असे बघेल म्हणाले. लोकांना एकत्र आणण्याचे काम जे लोक करत आहेत. त्यांचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. तर दुसरीकडे फूट समजामध्ये फूट पाडणाऱया लोकांचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, अशी टीका बघेल यांनी केली.
काँग्रेसने ऐक्य व अखंडता बळकट केली -