महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोरोना पार्श्वभुमीवर आई छिन्नमस्तिका जयंती साधेपणाने साजरी - DGP Sanjay Kundu reached Chintpurni and reviewed the arrangements

माता चिंतपूर्णीच्या परिसरात आई छिन्नमस्तिका जयंती ही कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी देवीच्या मंदिरला नववधूप्रमाणे सजवले होते. रंग-बिरंगी फुले ही परिसराची शोभा वाढवत होते. कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांसाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर मंदिरातील पूजा ही नेहमीप्रमाणेच साध्या पद्धतीने करण्यात आली.

Mother Chinnamastika Jayanti celebrated in a simple way
आई छिन्नमस्तिका जयंती साधेपणाने साजरी

By

Published : May 27, 2021, 12:17 PM IST

चिंतपूर्णी/ऊना - माता चिंतपूर्णीच्या परिसरात आई छिन्नमस्तिका जयंती ही कोरोना संचारबंदीच्या पार्श्वभुमीवर अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी देवीच्या मंदिरला नववधूप्रमाणे सजवले होते. रंग-बिरंगी फुले ही परिसराची शोभा वाढवत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश नाही. मात्र मंदिरातील पूजा ही नेहमीप्रमाणेच साध्या पद्धतीने करण्यात आली.

कोरोना पार्श्वभुमीवर आई छिन्नमस्तिका जयंती साधेपणाने साजरी

यज्ञ करून आई छिन्नमस्तिका जयंती केली साजरी -

मंदिरात पुजारी सभेच्यावतीने जयंतीच्यानिमित्ताने विधिवत पूजा-अर्चना आणि यज्ञ करण्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी देखील भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

देश-विदेशातील भाविकांना दिल्या शुभेच्छा -

मंदिर पुजारी सभेचे अध्यक्ष रविंद्र छिंदा यांनी देश-विदेश येथील सर्व भाविकांना आई छिन्नमस्तिका जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. वैश्विक कोरोना महामारीपासून सर्व मानव जाती सुरक्षित होवो असे साकडे घातले.

पोलीस महासंचालक संजय कुंडू पायरीवर नतमस्तक -

हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू यांनी देखील मंदिराला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते कोरोना नियमाचे पालन करत आई छिन्नमस्तिकेच्या मंदिर परिसरातील पायरीवर नतमस्तक झाले.

हेही वाचा - देवा, आता तूच वाचव! कोरोनामुक्तीसाठी दंडवत घालत देवांना आजोबांचे साकडे

ABOUT THE AUTHOR

...view details