नवी दिल्ली -संसदेच्या मान्सून अधिवेशनाचा आज पाचवा दिवस पार पडला. आज लोक सभेत दोन विधेयकांना मंजुरी देण्यात आली. लोकसभेत विरोधकांच्या गदारोळात व नारेबाजीत राष्ट्रीय खाद्य प्रौद्योगिकी (तंत्रज्ञान), उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक- 2021 ला मंजुरी देण्यात आली. राज्यसभेत ही दोन विधेयके यापूर्वीच मंजूर झाली आहेत.
पहिल्यांदाच केंद्रीय मंत्री बनलेल्या पशुपति कुमार पारस यांनी लोकसभे खाद्य प्रौद्योगिकी व उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था विधेयक 2021 सादर केले. यामध्ये हरयाणातील कुंडली आणि तामिळनाडूमधील तंजावर येथील खाद्य प्रौद्योगिकी क्षेत्राच्या दोन संस्थाना राष्ट्रीय स्तराच्या संस्थेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव आहे.