महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bill Gates : बिल गेट्स यांना कोरोनाची लागण; ट्विटरवरून दिली माहिती

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी मंगळवारी सांगितले की त्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. ( Bill Gates ) त्यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसत आहेत. ट्विटरद्वारे, त्यांनी ही माहिती दिली आहे.

Bill Gates
Bill Gates

By

Published : May 11, 2022, 7:49 AM IST

Updated : May 11, 2022, 8:23 AM IST

सिएटल -मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी मंगळवारी सांगितले की त्यांचा कोविड-19 चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसत आहेत. ( Corona Infection To Bill Gates ) ट्विटरद्वारे, त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, बर वाटत नाही तोपर्यंत मी अलिप्त राहणार आहे. मी भाग्यवान आहे की मला लसीकरण करण्यात आले आहे. आणि बूस्टर डोसही लावला आहे. तसेच, चाचण्या आणि चांगल्या औषधांचीही सोय आहे असही ते म्हणाले आहेत.


सिएटल-आधारित बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ही जगातील सर्वात प्रभावशाली खाजगी प्रतिष्ठान आहे, ज्याची सुमारे $65 अब्ज देणगी आहे. बिल गेट्स हे महामारी कमी करण्याच्या उपायांचे जोरदार समर्थक आहेत, विशेषत: गरीब देशांमध्ये लस आणि औषधे पोहोचवण्याच्या बाबतीत ते पुढे आहेत.

गेट्स फाउंडेशननेऑक्टोबर 2021 मध्ये सांगितले. कमी उत्पन्न असलेल्या देशांसाठी औषध निर्माता मर्कच्या अँटीव्हायरल COVID-19 गोळीच्या जेनेरिक आवृत्त्यांपर्यंत प्रवेश वाढविण्यासाठी ते $120 दशलक्ष खर्च करेल.


हेही वाचा -Musk on Trump Twitter: ट्रम्प यांचे ट्विटर खाते सुरू होणार! ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांची घोषणा

Last Updated : May 11, 2022, 8:23 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details