महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

एकाच कुटुंबातील पाच जणांची सामूहिक आत्महत्या, मृतामध्ये तीन मुलांचा समावेश - Bikaner Suicide News

Bikaner Suicide News : राजस्थानमधील बिकानेर इथं गुरुवारी एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्यांमध्ये पती-पत्नी तसेच त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

Five Members of Family Dies by Suicide
Five Members of Family Dies by Suicide

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 8:00 AM IST

Updated : Dec 15, 2023, 8:20 AM IST

एसपी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले

बिकानेर Five Members of Family Dies by Suicide : राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील मुक्ता प्रसाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. या घटनेची माहिती मिळताच एसपी तेजस्विनी गौतम यांच्यासह स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. तसंच एफएसएल टीमलाही तपासासाठी घटनास्थळी पाचारण करण्यात आलंय. आयजी ओम प्रकाश यांनी सांगितले की, प्रथमदर्शनी कुटुंबातील लोकांनी आत्महत्या केली आहे. सध्या विशेष पथक घटनास्थळी पुरावे गोळा करत आहे.

एकाच कुटुंबातील पाच जणांनी केली आत्महत्या : ही घटना मुक्ता प्रसाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंत्योदय नगरमध्ये घडली आहे. हे कुटुंब बस्ती परिसरात राहत होते. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आहे. सीओ सि टी हिमांशू यांनी सांगितलं की, सध्या आत्महत्येचं कारण समोर आलं नाही. पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसंच, सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या घटनेची माहिती मिळताच एसपी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

एका दिवसापूर्वीची घटना घडल्याचा संशय : पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुरावे शोधल्यानंतर ही घटना एक दिवसापूर्वीच घडल्याचं मानलं जातंय. कारण थंडीचा मोसम असल्यानं परिसरात मृतदेहांचा वास येत नव्हता. मात्र, त्यानंतर दुर्गंधी पसरू लागली. एका दिवसापूर्वी घरमालकही आला होता. पण त्यावेळी कोणीही गेट उघडलं नसल्यानं तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्यांनी या घरातील प्रमुखाला फोन केला होता. त्यांनी फोन न उचलल्यानं घरमालक घटनास्थळी पोहोचला. यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराची तपासणी केल्यावर घरात दोन दिवसांपूर्वीची वर्तमानपत्रेही सापडली आहेत.

हेही वाचा :

  1. चहावाल्याच्या आत्महत्येला सहा महिन्यानंतर वेगळं वळण, सहा जणांविरोधात गुन्हा
  2. युक्रेनमधील महिलेशी अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची आत्महत्या; ठाण्यातून आरोपी पतीला अटक
  3. Girl Suicide : प्रियकराकडून छळ, विद्यार्थिनीने केली आत्महत्या
Last Updated : Dec 15, 2023, 8:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details