महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरकारी सुट्ट्या कमी केल्यानं बिहारमध्ये तापलं राजकारण, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी 'हा' केला आरोप

Bihar Goverment School Holiday 2024: बिहारच्या सरकारी शाळांमध्ये 2024 च्या सुट्ट्यांचं कॅलेंडर जारी होताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. हिंदू सणांच्या सुट्ट्या कमी करण्याचा शिक्षण विभागानं निर्णय घेतल्यानं केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी संताप व्यक्त केला.

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 1:53 PM IST

Union Minister Giriraj Singh
गिरिराज सिंह

गिरिराज सिंह

पाटणा :सोमवारी (27 नोव्हेंबर) बिहारच्या शिक्षण विभागानं 2024 सालासाठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले. यावेळी बिहारमधील सरकारी शाळांच्या सुट्ट्यांमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. तसंच हिंदू धर्माशी संबंधित अनेक महत्त्वाच्या सणांच्या दिवशी सुटीही देण्यात आलेली नाही. यावरून भारतीय जनता पक्षानं आरोप केला. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी टीका केली आहे.

इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार : भाजपाचे फायर ब्रँड नेते मानले जाणारे गिरिराज सिंह यांनी त्यांच्या 'एक्स' हँडलवर केलेल्या पोस्टमध्ये म्हंटलंय की, 'इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार. नितीश आणि लालू सरकारनं शाळांमध्ये मुस्लिम सणांच्या सुट्या वाढवल्या आहे. हिंदू सणांच्या सुट्या संपवल्या. आहेत'

ज्या प्रकारे हिंदूंचे सण रद्द करण्यात आले आहेत आणि मुस्लिमांच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत, त्यावरून बिहारमधील सरकार इस्लामिक धर्माच्या आधारे काम करत असल्याचं स्पष्ट होतंय. या सुट्ट्या पुन्हा सुरू न केल्यास त्याचे परिणाम येत्या निवडणुकीत भोगावे लागतील. त्यांना मोहम्मद नितीश कुमार आणि मोहम्मद लालू यादव असं संबोधलं जाईल - गिरिराज सिंह, केंद्रीय मंत्री

  • ईद-मोहरमच्या सुट्ट्या वाढवल्या :गिरिराज सिंह यांनी त्यांच्या दुसऱ्या पोस्टमध्ये म्हंटलंय की, बिहारमध्ये अनेक हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत आणि ईद मोहरमच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. हा देखील गजवा-ए-हिंदचा एक भाग आहे.
  • बिहारमध्ये अनेक महत्त्वाच्या सणांनाही सुट्टी नाही :बिहार शिक्षण विभागाच्या नवीन कॅलेंडरनुसार, 2024 मध्ये हरतालिका तीज, जितिया, भाऊबीज, रक्षा बंधन, मकर संक्रांती, सरस्वती पूजन, जन्माष्टमी आणि रामनवमी या दिवशी शाळा सुरू राहतील. त्यामुळं आता दसऱ्याला 6 दिवसांऐवजी केवळ 3 दिवसांची सुट्टी मिळणार आहे.

मुस्लिम सणांच्या सुट्ट्यांची संख्या वाढली :शिक्षण विभागाच्या अधिसूचनेनुसार मुस्लिम धर्माशी संबंधित सणांच्या सुट्ट्यांची संख्येच वाढ झालीय. ज्यामध्ये शब-ए-बारात, ईद, बकरी ईद, मोहरम, चेहल्लूम आणि हजरत मुहम्मद साहब या दिवसांचा समावेश आहे. एकीकडं अनेक हिंदू सणांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असताना दुसरीकडं ईद आणि मोहरमच्या सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. Giriraj Singh On Nathuram Godse : 'नथुराम गोडसे भारताचा सुपुत्र', गिरीराज सिंह बरळले
  2. जोपर्यंत सनातन बालक जिवंत आहे तोपर्यंत बजरंग दलावर बंदी अशक्य -गिरिराज सिंह
  3. 'नितीश कुमारांनी टोपी घालावी किंवा नमाज अदा करावी, मात्र सनातनींना रोखल्यास हिशोब होईल -गिरीराज सिंह

ABOUT THE AUTHOR

...view details