महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Tejashwi Yadav : झुकणे सोपे! मात्र, आम्ही लढण्याचा निर्णय घेतलाय; बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव

बिहारमधील नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने पुन्हा उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची चौकशी सुरू आहे. आज तेजस्वी यांची दिल्लीतील सीबीआय कार्यालयात चौकशी करण्यात आली. या प्रकरणात लालू-राबडी देवी यांच्यासह 14 जणांना जामीन मिळाला आहे. मात्र, तेजस्वी यादव यांना सीबीआयने या प्रकरणी समन्स बजावले होते. दुसरीकडे, अंमलबजावणी संचालनालयाने मीसा भारती यांचीही चौकशी केली आहे.

Tejashwi Yadav
Tejashwi Yadav

By

Published : Mar 25, 2023, 8:16 PM IST

Tejashwi Yadav

दिल्ली/पाटणा : 'लँड फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या समन्सवरून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात येत आहे. तेजस्वी यांना सीबीआयच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. रेल्वेत जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआय त्यांची चौकशी करत आहे. सीबीआय कार्यालयात जाण्यापुर्वी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीत तेजस्वी यांनी म्हटले होते की, या देशात नतमस्तक होणे खूप सोपे आहे आणि लढणे खूप कठीण आहे. दरम्यान, आपण लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचवेळी ईडीने लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारतीची चौकशी केली आहे. लालू यादव यांची मोठी मुलगी आणि लहान मुलाचीही चौकशी झाली असून ती चौकशी संपली आहे.

जनता सर्व काही पाहत आहे : 'देशात आणीबाणीसारखी परिस्थिती': जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष लालन सिंह यांनी सीबीआयने जमीन घोटाळ्यात तेजस्वी यादव यांच्या चौकशीवर देशात आणीबाणीसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार हताश आणि निराशेने अशी कारवाई करत आहे. ते म्हणाले की, जनता सर्व काही पाहत असून, प्रत्येक गोष्टीचा हिशेब ते ठरवतील असही ते म्हणाले आहेत.

अखिलेश यादव मीसा भारती यांच्या घरी : सीबीआय नोकरीऐवजी जमीन घोटाळ्याप्रकरणी तेजस्वी यादव यांची चौकशी करत आहे. तसेच, लालू यादव यांची मोठी मुलगी मीसा भारती यांचीही ईडीकडून चौकशी होत आहे. त्यांचीही जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी होत आहे. दरम्यान, सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी मीसा भारतीच्या घरी पोहोचून त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. 'ईडी आणि सीबीआयचा वापर प्रादेशिक पक्षांविरोधात केला जात आहे असा थेट आरोप त्यांनी केंद्र सरकारवर केला आहे.

प्रकरण 2004 ते 2009 : बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आज शनिवारी सकाळी 10.30 वाजता सीबीआय कार्यालयात चौकशीला सुरुवात झाली होती. सीबीआय मुख्यालयाच्या 500 मीटर अगोदर पोलिसांनी एकच वाहन जाण्यासाठी बॅरिकेड लावले होते. तेजस्वी यांचे वाहन थेट सीबीआय कार्यालयात गेले. त्यांच्या पुढे आणि मागे दिल्ली पोलिसांची वाहने होती. लालू कुटुंबातील 7 जण आरोपी आहेत. मात्र, तेजस्वी यादव यांच्या नावामुळे कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. तेजस्वी यादव हे सध्या बिहार सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. जॉबसाठी जमीन प्रकरण 2004 ते 2009 दरम्यान यूपीए सरकारमध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असतानाच्या काळातील आहे. रेल्वेमंत्री असताना रेल्वे भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. नोकरी मिळवून देण्याच्या बदल्यात अर्जदारांकडून जमीन व भूखंड घेण्यात आले असा आरोप झालेला आहे.

हेही वाचा :Rahul Gandhi Disqualification : राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व रद्द; प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

ABOUT THE AUTHOR

...view details