महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bihar Crime News : बिहारमध्ये जमावाची तरुणीला विवस्त्र करून मारहाण - बिहारमध्ये तरुणीला विवस्त्र करून मारहाण

बिहारच्या बेगुसरायमध्ये तरुणीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. पोलीस आरोपींवर कारवाई करण्याबाबत बोलत असतानाच प्रमुख विरोधी पक्ष भाजपने याचा संबंध मणिपूरमधील घटनेशी जोडला आहे.

Bihar Crime News
बिहार क्राइम न्यूज

By

Published : Jul 22, 2023, 7:36 PM IST

योगेंद्र कुमार, एसपी, बेगुसराय

बेगुसराय (बिहार) : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्याचे प्रकरण अद्याप थंडावले नसताना आता बिहारमधूनही अशीच एक घटना उघडकीस आली आहे. बिहारच्या बेगुसरायमधून एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही लोक मुलीचे कपडे फाडत तिच्याशी गैरवर्तन करताना दिसत आहेत.

पीडित तरुणी अल्पवयीन आहे : या व्हायरल व्हिडिओप्रकरणी त्वरित कारवाई करण्यात आली आहे. पीडित तरुणी अल्पवयीन असून या प्रकरणी 4 जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पॉक्सो कायदा तसेच एससी-एसटी आयटी कायद्याच्या कलमांतर्गत नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील एक आरोपी संगीत शिक्षक असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बाकीच्या तीन आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. पीडितेचा आरोप आहे की, तिला घरात बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच तिला विवस्त्र करून बेदम मारहाणही करण्यात आली.

तरुणी आणि तिच्या प्रियकराला बेदम मारहाण : हे प्रकरण बेगुसराय जिल्ह्यातील तेघरा पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावाशी संबंधित आहे. येथे गुरुवारी रात्री अर्धा डझनहून अधिक लोकांनी तरुणीला तिच्या प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर त्यांनी या दोघांनाही बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या दरम्यान मुलगी दयेची याचना करत राहिली, मात्र जमावाने तिचे ऐकले नाही. ज्या व्यक्तीसोबत तरुणीला पकडले आहे, ती व्यक्ती त्याच गावातील रहिवासी आहे. तो गावात कीर्तन करतो आणि लोकांना हार्मोनियम शिकवतो. त्याचे तरुणीसोबत अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. गुरुवारी रात्री ग्रामस्थांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडून बेदम मारहाण केली. या दरम्यान तरुणीसोबत अश्लिल कृत्यही करण्यात आले. जमावाने दोघांचा व्हिडिओ बनवला आहे.

व्हिडीओत काय आहे : व्हिडिओमध्ये एका व्यक्तीला गावकऱ्यांनी एका मुलीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचे दिसत आहे. अचानक आलेल्या लोकांमुळे दोघांनी कपडे घालण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी त्यांना कपडे घालू दिले नाहीत. लोकांनी मुलीने घातलेले कपडे फाडले. या दरम्यान त्यांनी दोघांना शिवीगाळही केली. महिलेच्या साथीदाराने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता लोकांनी त्याला खेचून आत ढकलले आणि त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. लोकांनी या घटनेचा व्हिडिओही बनवला आहे.

पोलिसांचा तपास सुरू : या प्रकरणात कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही, असे पोलिस अधीक्षकांनी सांगितले आहे. तेघरा पोलीस ठाण्याला कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीडित महिला अजूनही महिला पोलिस ठाण्याच्या प्रमुखांकडेच आहे. तिचे मेडिकल चेकअप केले जात आहे. तिच्या वक्तव्याच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. सध्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या लोकांची ओळख पटवली जात आहे.

हेही वाचा :

  1. Manipur Women Parade : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यापूर्वी जमावाने लोकांची घरे जाळली, अनेकांना मारले ठार; एफआयआरमध्ये नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details