महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Bihar CM Nitish Kumar on Maharashtra Visit: विरोधकांच्या एकजुटीकरता नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्न करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. नितीश कुमार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

नितीश कुमार महाराष्ट्र दौरा
नितीश कुमार महाराष्ट्र दौरा

By

Published : May 11, 2023, 8:15 AM IST

Updated : May 11, 2023, 1:38 PM IST

पाटणा : सर्वोच्च न्यायालय सत्ता संघर्षावर आज सुनावणी करणार असतानाच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जेडीयू अध्यक्ष लालन सिंह, मंत्री संजय झा आणि बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष देवेशचंद्र ठाकूर हेही असणार आहे. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा भाजपविरोधात भक्कम आघाडी उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला आहे. नितीश कुमार आज मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव गट) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत विरोधकांच्या ऐक्याबाबत चर्चा होणार आहे.

पाटणा येथे होणाऱ्या बैठकीचे देणार निमंत्रण : नितीश कुमार आज शरद पवार आणि एकनाथ ठाकरे यांची भेट घेऊन पाटण्यात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीचे निमंत्रण देणार आहेत. याबाबत देवेशचंद्र ठाकूर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस हे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा भाग आहेत. त्याचवेळी बिहारमध्ये काँग्रेससोबत जेडीयू आणि आरजेडीची युती आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय पातळीवर स्थापन होणाऱ्या विरोधी आघाडीत प्रादेशिक पक्षदेखील एकत्रित येत आहे.

नितीश कुमार यांनी हेमंत सोरेन यांची घेतली भेट :याआधी बुधवारी नितीश कुमार यांनी हेमंत सोरेन यांची रांचीमध्ये भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. झारखंडमध्ये महाआघाडीचे सरकार असून त्यामध्ये झामुमो, काँग्रेस आणि आरजेडीचा समावेश आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांना जोरदार एकत्र यावे लागेल, असे हेमंत सोरेन यांनी स्पष्ट केले.

नितीश कुमार यांनी नवीन पटनायक यांचीही घेतली भेट:मंगळवारी नितीश कुमार यांनी भुवनेश्वरमध्ये ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही भेट घेत बराच वेळ चर्चा झाली. मात्र, बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. पटनायक म्हणाले की, आमच्यात जुनी मैत्री असल्याने बैठक चांगली होती. पण राजकारणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याचवेळी नितीश यांनी पटनायक यांच्याबरोबर वैयक्तिक संबंध असल्याचेही सांगितले. या बैठकीतून राजकीय महत्त्व काढू नये, असे त्यांनी आवाहन केले.

मिशन 2024 संदर्भात नितीश कुमारांची मोहीम: भाजपपासून वेगळे झाल्यापासून नितीश कुमार हे विरोधी एकजुटीसाठी सातत्याने राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची भेटी घेत आहे. गेल्या महिन्यात त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीएम नेते सीताराम येचुरी, सीपीआय नेते डी. राजा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोलकात्यात आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची लखनौमध्ये भेट घेतली.

हेही वाचा-

Maharashtra Political Crisis : जाणून घ्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची संपूर्ण टाइमलाइन

Maharashtra political Crisis: सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च महानिकाल ! या आहेत शक्यता?

Karnataka CM Rejects Exit Poll : एक्झिट पोलचे निकाल बरोबर नसतात, सत्ता भाजपचीच येणार; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Last Updated : May 11, 2023, 1:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details