महाराष्ट्र

maharashtra

बिहारमध्ये नितीशराज! आरजेडी सर्वात मोठा पक्ष तर एमआयएमने केले सर्वांनाच चकीत

By

Published : Nov 11, 2020, 7:59 AM IST

Updated : Nov 11, 2020, 3:06 PM IST

बिहार
बिहार

11:36 November 11

2025 हे आमचे लक्ष्य - चिराग पासवान

बिहारमध्ये मुख्यमंत्री कोण होणार हे, भाजपने आणि जेडीयूने ठरवावं. मतमोजणीत घोटोळा झाल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. मात्र, निकाल त्यांच्याबाजूने लागला असता तर, मतमोजणीत घोटाळा झाला, असे ते म्हणाले नसते. तसेच आमच्या पक्षाची कक्षा वाढली असून 2025 हे आमचे लक्ष्य आहे. केंद्रात आम्ही मोदींचे समर्थन करत आलो आहेत. तसेच येथून पुढेही करत राहणार. राज्यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. तसेच सत्तेत राहणे आमचे लक्ष असते, तर आम्ही एनडीएमधून बाहेर पडलो नसतो. संघर्षाचा रस्ता आम्ही निवडला आहे, असे चिराग पासवान म्हणाले. 

10:16 November 11

पाटण्यातील जदयू कार्यालयाबाहेर पोस्टर

राज्यातील मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने विजय नोंदवल्यानंतर पाटण्यातील जदयू कार्यालयाबाहेर पोस्टर लावण्यात आले. 

10:14 November 11

'बिहार में बहार आयी, एनडीए ने कमल किया'

'बिहार में बहार आयी, एनडीए ने कमल किया' पंतप्रधान मोदींवर  बिहार आणि संपूर्ण देशाचा विश्वास आहे. देशाची प्रगती व्हावी, अशी लोकांची इच्छा आहे. विरोधी पक्षांनी केलेले राजकारणाचे देशवासियांनी नाकारले, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. 

07:42 November 11

चर्चेतील उमेदवार -

राघोपूरमधून आरजेडी नेते तेजस्वी यादव विजयी. त्यांनी जेडीयूच्या सतीश कुमारचा पराभव केला. शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा आणि काँग्रेसचे उमेदवार लव सिन्हा यांचा बांकीपुरात पराभव झाला. बांकीपूरमधून भाजपचे उमेदवार नितीन नवीन विजयी झाले आहेत. या जागेवरुन लढवित असलेल्या पुष्पम प्रिया चौधरी यांचादेखील पराभव झाला. तसेच नितीश यांचे मंत्री जय कुमार सिंह यांचा दिनारातून पराभव झाला.

07:42 November 11

अमित शाह यांनी मानले जनतेचे आभार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टि्वट करत बिहारच्या जनतेचे आभार मानले. जनतेने विकास आणि सुशासनाला मत दिले आहे, असे ते टि्वटमध्ये म्हणाले. 

07:42 November 11

मोदींचे टि्वट

पंतप्रधान मोदींनी बहूमत दिल्याबद्दल बिहारच्या जनतेचे आभार मानले. या निकालामधून बिहारच्या आपेक्षा आणि स्वप्न काय आहेत? हे स्पष्ट झालं, असे टि्वट त्यांनी केले. 

07:42 November 11

चिराग पासवान यांना एकच जागा

एनडीएमधून बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला फक्त एक जागा जिंकता आली आहे.  

07:41 November 11

महागठबंधनचा 110 जागांवर विजय

राष्ट्रीय जनता दल - 75

काँग्रेस- 19  

सीपीआय माले  - 12

सीपीआय - 2

सीपीएम - 2  

07:41 November 11

विधानसभा निवडणुकीत एनडीएला 243 पैकी 125 जागांवर विजय मिळाला.

भाजप - 74

जेडीयू - 43

विकासशील इन्सान पार्टी - 4

हिंदुस्तानी अवाम मोर्चा - 4

07:13 November 11

Bihar Latest Updates live : बिहारमध्ये नितीशराज! निकालाबाबतचे क्षणोक्षणीचे अपडेट्स...

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीकडे निकाल हाती आले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे. महागठबंधनने 110 जागांवर विजय मिळवला. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव एनडीएला तगडं आव्हान निर्माण करण्यात यशस्वी झाले. स्पष्ट बहुमत दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत बिहारमधील जनतेचे आभार मानले.  

Last Updated : Nov 11, 2020, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details