अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध मेरठ (उ. प्रदेश) : बिग बॉस सीझन 16 च्या ग्रँड फिनालेचा शेवटचा आठवडा बाकी आहे. या आठवड्यात मूळची उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील अर्चना गौतम आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर वरचढ होताना दिसत आहे. दाक्षिणात्य चित्रपटांत अभिनय करून तिने देशभरात प्रसिद्धी मिळवली आहे. मेरठमध्ये तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या समर्थनार्थ लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यानिमित्ताने अभिनेत्रीच्या वडिलांनी ईटीव्ही भारतने खास बातचीत केली. अर्चनाला सर्वांचे प्रेम मिळेल आणि ती विजयी होईल याची मला 100 टक्के खात्री असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले.
बिग बॉस मध्ये सर्वाधिक चर्चेत : अर्चना ही बिग बॉसच्या या पर्वात सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धक आहे. तिला प्रेक्षकांची खूप पसंतीही मिळते आहे. अर्चना गौतमचे वडील गौतम बुद्ध मंगळवारी स्वतः मेरठमध्ये आपल्या मुलीच्या समर्थनार्थ बाहेर आले आणि त्यांनी आपल्या मुलीला स्पर्धेत जिंकण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली. ते म्हणाले, त्यांच्या मुलीला देशभरातून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. त्यांची मुलगी अर्चना कार्यक्रमात प्रत्येकाला चोख आणि समर्पक उत्तरे देते.
शोमध्ये अनेकांशी वाद : शोमध्ये अर्चनाचे काही डायलॉग खूप प्रसिद्ध झाले आहेत. अर्चनाचे वडील म्हणाले की, त्यांच्या मुलीचे डायलॉग्स खूप पसंत केले जात आहेत. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव 'सिलबत्ते वाली अर्चना' ठेवले आहे. ते पुढे म्हणतात की, 'मला माहित आहे की माझी मुलगी थोडी रागीट आहे, कारण मेरठच्या लोकांमध्ये थोडा राग असतो. इथल्या पाण्यातच काहीतरी आहे. अर्चना गौतम ही बिग बॉसची अशी स्पर्धक आहे, जी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीने स्वतःशी बांधून ठेवते. कधी अर्चना कॉमेडी करते, तर कधी स्पर्धकांना आव्हानही देते. शोमध्ये तिचे आतापर्यंत अनेक स्पर्धकांसोबत वादही झाले आहेत.
कोण आहे अर्चना गौतम? :अर्चना गौतम हिने 2022 मध्ये मेरठच्या हस्तिनापूर विधानसभेतून काँग्रेस उमेदवार म्हणून नशीब आजमावले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान अर्चना गौतमला काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी तिकीट दिले होते. 27 वर्षीय अर्चना गौतमने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. अर्चनाने 2015 मध्ये 'ग्रेट ग्रँड मस्ती' या चित्रपटातून पदार्पण केले होते. याशिवाय तिने श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला 'हसीना पारकर' आणि 'बरोटा कंपनी' सारख्या चित्रपटांतही काम केले आहे. याशिवाय अर्चनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. 2018 मध्ये अर्चनाने मिस बिकिनी इंडिया 2018 चा खिताबही जिंकला होता. तिच्या बोल्ड इमेजमुळे तिच्या फॉलोअर्सची संख्याही लक्षणीय आहे.
हेही वाचा :Propose Day 2023 : लग्नबंधनात अडकणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्राने कियारा अडवाणीला असे केले होते प्रपोज केले