महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट - रुबिना दिलैक

अभिनेत्री रुबिना दिलैकच्या कारचा शनिवारी अपघात झाला. तिचा पती अभिनव शुक्ला याने ट्विटरवर अपडेट शेअर करत रूबिना आता कशी आहे, हे सांगितले आहे. या प्रकरणी पोलिसही त्यांना सहकार्य करत असल्याचे त्याने सांगितले आहे.

Rubina Dilak shares update after car accident
अभिनेत्री रुबिना दिलैकच्या कारचा अपघात

By

Published : Jun 11, 2023, 2:18 PM IST

हैदराबाद : रूबिना दिलैक ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. दरम्यान रुबिनाच्या गाडीचा अपघात झाला आहे. रुबिनाचा पती अभिनव शुक्ला यांनी ट्विटरवर अपघातस्थळाचे काही फोटो शेअर करून ही माहिती दिली आणि पत्नी रुबीनाच्या हेल्थ अपडेटही दिले. रुबिनाने आज ट्विटरवर सांगितले की, अपघातामुळे तिच्या डोक्याला आणि पाठीच्या खालच्या बाजूस दुखापत झाली. तत्पूर्वी, अभिनव शुक्ला यांनी शनिवारी ट्विटरवर खराब झालेल्या कारच्या फोटोंसह ही बातमी दिली होती.

अभिनव शुक्लाची पोस्ट :अभिनव शुक्लाने त्याच्या पोस्टमध्ये, त्याने सांगितले की रुबिना बरी आहे. तो तिला वैद्यकीय उपचारासाठी घेऊन जात आहे. या घटनेमुळे, माझ्या डोक्याला आणि पाठीवर मार लागला, असे रुबीनाने ट्विट केले. आम्ही वैद्यकीय चाचण्या केल्या, सर्व काही ठीक आहे. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणावर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मी सर्वांना रस्त्यावर सावध राहण्याचे आवाहन करतो, नियम आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी आहेत, असे अभिनव शुक्लाने म्हटले आहे. आमच्यासोबत जे घडले ते तुमच्यासोबत होऊ शकते, असे अभिनवने म्हटले आहे. अभिनवने ट्विट करून चाहत्यांना अपघाताची माहिती दिली होती.

मुंबई वाहतूक पोलिसांची प्रतिक्रिया : ट्विटला उत्तर देताना, मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रतिक्रिया दिली, ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलिस स्टेशनला घटनेची तक्रार करा. रुबीनाने असंख्य मालिकांंमध्ये काम केलेले आहे. खतरों के खिलाडी 12 मध्ये दिसल्यानंतर रुबीना झलक दिखला जा 10 मध्ये दिसली होती. रुबिनाने सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो बिग बॉसचा सीझन 14 जिंकला. ती पुनर्विवाह - एक नई उमेद, सिंदूर बिन सुहागन, छोटी बहू, आणि शक्ती: अस्तित्व के अहसास की यासारख्या अनेक मालिकांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा :

  1. Rubina Dilaik Photo : रुबैना दिलैकने इंस्टावर शेअर केले हॉट फोटो; पाहा तिच्या रेड ब्यूटीची झलक
  2. VIDEO : रुबीना दिलैकने घेतले नवे चॅलेंज, पाईपवरुन केला ओढा पार
  3. रूबिना दीलेकने उचलली बिग बॉस १४ ची ट्रॉफी!

ABOUT THE AUTHOR

...view details