भोपाळ - मध्यप्रदेश एटीएसने जुन्या शहरातून सुमारे सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. एमपी एटीएसने एक दिवसांपूर्वी सहारनपूर येथील देवबंदच्या खानकाह रोड येथील एका वसतीगृहातून तिघांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन एटीएसने सहा जणांना ताब्यात घेण्यात ( Terrorist Caught in Bhopal ) आले. संशयित भोपाळच्या ऐशबाग, निशातपुरा या भागात भाड्याच्या घरात राहत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे बारा लॅपटॉप व काही धार्मिक पुस्तके एटीएस पथकातील पोलिसांनी जप्त केली आहेत.
गोळी मारुन तोडला दरवाजा -रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सुमारे 50 बंदुकधारी पोलिसांनी ऐशबाग परिसरातील एका घराचे दार गोळी मारुन तोडले. त्यानंतर घरात राहणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यानंतर निशातपुरा भागातील एका घरातून चौघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून लॅपटॉप व काही धार्मिक पुस्तके जप्त केली आहेत.