महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया, पहा ईटीव्ही भारत'चा हा खास रिपोर्ट

महाराष्ट्रातील भाऊसाहेब हे 1993 पासून भारत भ्रमणावर आहेत. त्यांनी आजपर्यंत 5 वेळेस भारत भ्रमण केले आहे. आता ते 6 वी वेळेस भारत भ्रमणावर आहेत. ईटीव्ही भारत'ने याबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आहे.

हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया
हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया

By

Published : Sep 15, 2021, 3:25 PM IST

छत्तीसगढ़ (कोरबा)-कोणताही बदल असो, तो एका व्यक्तीपेक्षा, एका समुहाकडून जास्त प्रभावीपणे होत असतो, असे बोलले जाते. यासाठी संघटनात्मक बळाची गरज असते. परंतु, महाराष्ट्रातील भाऊसाहेब यांचा या संकल्पनेवर विश्वास नसावा. त्यामुळेच त्यांनी 5 वेळा भारत भ्रमण केले आहे. दरम्यान, हे भ्रमण आवड म्हणून नाही, तर ते सामाजिक जणजागृतीसाठी करत आहेत. यामध्ये भाऊसाहेब लोकांना हुंडा पद्धती विषयी सांगतात. तसेच, समाजातील इतर वाईट प्रथांविषायी जनजागृती करतात. यावेळी लोकांशी बोलताना हे हुंडा घेणे-देणे समाजाची अधोगती आहे. त्यामुळे ही प्रथा कायमस्वरुपी बंद करायला हवी असेही ते सांगतात.

हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया, ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

कोरबा से जाएंगे जबलपुर

भाऊसाहेब यांनी आजपर्यंत पाच वेळा संपूर्ण देशाला भेट दिली आहे. भाऊसाहेब अलीकडेच कोरबा येथे पोहोचले आहेत. त्यांना कोरबा येथे येऊन 2 ते 3 दिवस झाले आहेत. सध्या ते टीपी नगरच्या गुरुद्वारामध्ये मुक्कामी आहेत. जिथे त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था गुरुद्वारानेच केली आहे. दरम्यान, भाऊसाहेबांनी कोरबा येथे मुक्काम करताना एनटीपीसी, सीएसईबी आणि मुलांच्या व्यवस्थापनाच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना त्यांच्या उद्देशाबद्दल सांगितले. तसेच, लोकांना जागरूक करण्यासाठी योजना तयार करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. आता भाऊसाहेबांचा पुढील मुक्काम, मध्य प्रदेशातील जबलपूर येथे आहे.

लोकांनी हुंडा घेऊन नये आणि हुंडा देऊ नये

सायकल हे माझे घर आहे. आवश्यक असणारे सर्व सामान हे सायकलवर असते. मग ते हेल्मेट असो, दैनंदिन गरजेच्या इतर वस्तू किंवा कपडे, कागदपत्रे हे सगळे सोबत असते. सुमारे 80 किलोपर्यंतचे सामान सायकलवर आहे. दरम्यान, भाऊसाहेब सांगतात यामध्ये माझा कोणताही स्वार्थ नाही. माझी भावना आहे की, लोकांनी स्त्रीभ्रूण हत्या करु नये, लोकांनी हुंडा घेऊन नये आणि हुंडा देऊ नये. आज आपण विचार करायला हवा आपण माणूस म्हणून काय करतो आहोत. या प्रथा समाजाला मागे घेऊन जाणाऱ्या आहेत. असही भाऊसाहेब म्हणाले आहेत.

हुंडा प्रथेविरुद्ध देशभर सायकलवरून जनजागृती करणारा अवलीया, ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

हे काम करत राहणार

भाऊसाहेब यांनी 1993 हे भ्रमण सुरू केलेले आहे. ते त्यावेळी 20 वर्षांचे होते. त्यांनी लग्न केलेले नाही. त्यामुळे परिवार नाही. तसेच, भाऊसाहेब यांच्याकडे मोबाई नाही. त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. ते निर्व्यसनी आहेत. तसे ते शाखाहारी आहेत. आपण किती बदल होईल किंवा नाही याबद्दल काही विचार न करता हे काम करत राहणार असल्याचे भाऊसाहेब यांनी ईटीव्ही'शी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details