महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपाच्या राज्य प्रभारींची यादी जाहीर; तावडेंकडे हरियाणा तर पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशचा भार

हरियाणा राज्याच्या प्रभारीपदी विनोद तावडेंची निवड करण्यात आली आहे. तर सह प्रभारी म्हणून अन्नपूर्णा देवींना नेमण्यात आले आहे. तसेच, मध्य प्रदेशच्या सह-प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंची निवड करण्यात आली आहे...

Bharatiya Janata Party (BJP) releases list of its state in-charges Vinod Tawde and Pankaja Munde are also on the list
भाजपाच्या राज्य प्रभारींची यादी जाहीर; तावडेंकडे हरियाणा तर पंकजा मुंडेंकडे मध्य प्रदेशचा भार

By

Published : Nov 14, 2020, 8:13 AM IST

नवी दिल्ली :भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी आपल्या राज्य प्रभारींची यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील दोन भाजपा नेत्यांचा समावेश आहे. विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर दोन वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

विनोद तावडेंकडे हरियाणा, तर मुंडेंकडे मध्य प्रदेशचा प्रभार..

हरियाणा राज्याच्या प्रभारीपदी विनोद तावडेंची निवड करण्यात आली आहे. तर सह प्रभारी म्हणून अन्नपूर्णा देवींना नेमण्यात आले आहे. तसेच, मध्य प्रदेशच्या सह-प्रभारी म्हणून पंकजा मुंडेंची निवड करण्यात आली आहे. या राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी पी. मुरलीधर राय यांना देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर होते नाराज

विनोद तावडे आणि पंकजा मुंडे हे पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. विधानसभा निवडणुकीत तावडे यांना डावलण्यात आले होते. तर पंकजा मुंडे यांना पराभव स्विकारावा लागला होता. विधानसभा निवडणुकीनंतर तर हे दोन्ही नेते एका बाजूला फेकले गेले होते. त्यांना काही तरी जबाबदारी दिली जाईल अशी चर्चा होती. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून त्यांना केंद्राय स्तरावर महत्वाची जबाबदारी मिळाली आहे.

महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी..

महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून सी. टी. रवी यांची निवड करण्यात आली आहे. तर, सह प्रभारी म्हणून ओमप्रकाश धुर्वे आणि जयभान सिंह पवैया यांना नेमण्यात आले आहे.

तरुण चुग यांच्याकडे तीन राज्यांची जबाबदारी..

जम्मू-काश्मीर, लडाख आणि तेलंगणा अशा तीन राज्यांचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची निवड करण्यात आली आहे.

हेही वाचा :भाजपकडून पंकजा मुंडेंसह विनोद तावडेंना राष्ट्रीय पातळीवर संधी

ABOUT THE AUTHOR

...view details