कोलकाता - ग्राहकांना ऑनलाईन अन्नपदार्थ घरी पोहोचविण्याची सेवा देणारी झोमॅटो नेहमीच चर्चेत असते. आता पश्चिम बंगालमध्ये झोमॅटोविरोधात त्यांच्या डिलिव्हरी बॉईजनीच आठवडाभरापासून आंदोलन छेडले आहे.
पश्चिम बंगालमध्ये बीफ आणि डुकराचे मटणाची डिलिव्हरी करण्यास डिलिव्हरी बॉयनी नकार दिला आहे. कंपनी आमचे ऐकत नसून धर्माविरुद्दच्या गोष्टी करायला सांगत आहे. त्यामुळे आमच्या भावना दुखवल्या जात असल्याचं डिलिव्हरी बॉईजनी म्हटले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावनांशी खेळू नये. याचबरोबर पगारवाढ करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या डिलिव्हरी बॉईजनी केली आहे.