बाली(राजस्थान) - लॉकडाऊनमुळे देशातील उद्योगधंदे बंद पडले आहेत. इतर राज्यात कामासाठी आलेले मजूर अडकून पडले आहेत. हे स्थलांतरीत मजूर मिळेल त्या वाहनाने किंवा चालत घर जवळ करत आहे. अशाच प्रकारे मुंबईत काम करणारा मुळचा राजस्थानचा पाबूराम राईका गेल्या १७ एप्रिलला चालत घरी जायला निघाला. त्याच्या मालकाने त्याला पगार देण्यासही नकार दिला. सतत सात दिवस कधी रस्त्याने तर कधी रेल्वे रुळावरून तो चालत होता.
चालत असताना पाबुरामची खाण्या-पिण्याची व्यवस्था होत होती. मजलदरमजल करत तो अहमदाबादला पोहोचला. मात्र, त्याच्या पायांची अवस्था फार वाईट झाली होती. मृत पाबूरामचा एक भाऊ अहमदाबादला मिठाईच्या दुकानात काम करतो. त्याला पाबुरामबद्दल माहिती मिळाली. त्याने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र २० दिवस उपचारानंतरही पाबुरामचा रुग्णालयातच मृत्यू झाला.