महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 21, 2020, 9:54 AM IST

ETV Bharat / bharat

कोरोना झाल्याच्या संशयातून झारखंडमध्ये तरुणाने केली आत्महत्या

भरकठ्ठा गावात १९ एप्रिलला रात्री एका युवकाने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. मात्र, पोलिसांना माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून चौकशी सुरू केली आहे.

कोरोना झाल्याच्या संशयातून झारखंडमध्ये तरुणाने केली आत्महत्या
कोरोना झाल्याच्या संशयातून झारखंडमध्ये तरुणाने केली आत्महत्या

गिरिडीह (झारखंड)- जिल्ह्यातील बिरनी परिसरात एका युवकाने गळफास घेऊन जीवन संपवले. या युवकाने आत्महत्येपूर्वी चिट्ठी लिहीली असून कोरोना पॉझिटिव्ह असल्याने आत्महत्या करत असल्याचे नमुद केले आहे. ही घटना भरकठ्ठा येथे घडली. मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना या घटनेची माहिती न देताच अंत्यसंस्कार केले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

भरकठ्ठा गावात १९ एप्रिलला रात्री एका युवकाने आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केले. मात्र, पोलिसांना माहिती दिली नाही. दुसऱ्या दिवशी स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून चौकशी सुरू केली आहे.

युवकाचे नाव सुरेश पंडित आहे. त्याने कोरोना संक्रमित असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. मला माफ करा, हिम्मत ठेवा, वेळेवर उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो, असे त्याने लिहिले आहे. माझ्या कुटुंबीयांना याबद्दल माहिती नाही, त्यामुळे त्यांना माफ करा, कोणी कोणावर आरोप करू नका, हा विश्वव्यापी आजार आहे, याचा सामना करा, असेही त्याने चिठ्ठीत लिहिले आहे.

मी एका लग्न समारंभात गेलो होतो, त्यामुळे मला कोरोना झाला असण्याची शक्यता आहे, असेही तरुणाने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details