दिल्ली -हजरत निजामुद्दीन ठाण्याअंतर्गत भोगल परिसरात कामावरुन परतणाऱ्या युवतीची एका माथेफिरु युवकाने चाकू भोकसून हत्या केली आहे. आरोपी युवतीवर एकतर्फी प्रेम करत होता आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. आरोपी युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू आहे. या माथेफिरु युवकाचे नाव मुनासिर (वय २५) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन ठाण्याअंतर्गत भोगल बाजारात एकतर्फी प्रेमातून शुक्रवारी संध्याकाळी एका तरुणाने तरुणीची चाकू भोकसून हत्या केली. सराल कालेखा भागात राहणाऱ्या या युवतीचे वय अंदाजे २० ते २१ वर्ष सांगितले जात आहे. ती एका घरात खासगी मदतनीस म्हणून काम करत होती. शुक्रवारी कामावरुन परतत असताना युवकाने हा गुन्हा केला. यावेळी घटनास्थळावर उपस्थित लोकांनी आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी लोकांना हातातल्या चाकूचा धाक दाखवत राहिला. मात्र, नागरिकांनी धाडसाने आरोपीला पकडले आणि चांगलाच चोप दिला, नंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
एकतर्फी प्रेमातून युवतीची चाकूने भोकसून हत्या - चाकू
तरुणीवर आरोपी तरुण एकतर्फी प्रेम करत होता. त्याला तरुणीसोबत लग्न करायचे होते. या संदर्भात त्याने तरुणीकडे वारंवार विचारणा देखील केली होती. मात्र तरुणी आरोपीला वारंवार नकार देत होती. या रागातून युवकाने तिची हत्या केली.
दक्षिण पश्चिम विभागाच्या विभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना संध्याकाळी ७ वाजता या घटनेची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी युवतीला एम्स ट्रामा रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केले. या तरुणीवर आरोपी तरुण एकतर्फी प्रेम करत होता. त्याला तरुणीसोबत लग्न करायचे होते. या संदर्भात त्याने तरुणीकडे वारंवार विचारणा देखील केली होती. मात्र तरुणी आरोपीला वारंवार नकार देत होती. या रागातून युवकाने तिची हत्या केली. या माथेफिरु युवकाचे नाव मुनासिर (वय २५) असे असून तो देखील सराय कालेखां भागाचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू ताब्यात घेतला असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या घटनेनंतर दिल्लीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.