नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संकटात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आत्यवश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. हिमाचल प्रदेशातील हमिरपूरमधील एका डॉक्टरने कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी आपले लग्न पुढे ढकलले आहे.
सलाम कार्याला! लग्न पुढे ढकलून डॉक्टरचे कर्तव्याला दिले प्राधान्य - doctor marriage news
कोरोना संकटात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि आत्यवश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. हिमाचल प्रदेशातील हमिरपूरमधील एका डॉक्टरने कोरोनाग्रस्तांची सेवा करण्यासाठी आपले लग्न पुढे ढकलले आहे.
डॉ. विकास सिंह असे या डॉक्टरांचे नाव आहे. विकास यांचे लग्न 5 मे ला लग्ण होणार होते. मात्र, त्यापूर्वी त्यांची कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी 11 एप्रिलला नियुक्ती करण्यात आली. कर्तव्याला प्राधान्य त्यांनी लग्न पुढे ढकलण्या निर्णय घेतला आणि कामावरु रुजू झाले. त्यांची होणारी पत्नीही एख आयुर्वेदकी डॉक्टर आहे. कुटुंबीयांनीही त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान देशात सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी लग्न संमारंभांना प्रशासनाकडून परवानगी नकारण्यात येत आहे. त्यामुळे, मोजक्या नातेवाईकांसह विवाह इच्छुक युवक-यवती घरात लग्न करताना दिसून येत आहे. देशभर पसरलेल्या कोरोना संकटावर सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक लग्न लागली आहेत.