महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आर्टिकल ३७० मोडीत काढाल तर खबरदार... मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारला इशारा - pdp

'आर्टिकल ३७० रद्द करताच तुम्हाला भारत आणि जम्मू-काश्मीरदरम्यान असलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीची बोलणी कराव्या लागतील. हे मुस्लीम-बहुल राज्य तुमच्यासोबत (भारतासोबत) राहण्यास तयार होईल काय?' असा प्रश्न मुफ्ती यांनी केला आहे.

मेहबूबा मुफ्ती

By

Published : Mar 30, 2019, 9:27 PM IST

श्रीनगर - पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टीच्या नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तींनी केंद्र सरकारला 'आर्टिकल ३७० मोडीत काढण्याचा प्रयत्नही न करण्याचा' इशारा दिला आहे. असे केल्यास तुमचे (केंद्राचे) जम्मू-काश्मीरशी असलेले संबंध संपुष्टात येतील, अशी धमकी दिली आहे. आर्टिकल ३७० ने जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देण्यात आला आहे.

आर्टिकल ३७० रद्द करताच राज्यात वेगळीच परिस्थिती तयार होईल. 'आर्टिकल ३७० रद्द करताच तुम्हाला भारत आणि जम्मू-काश्मीरदरम्यान असलेले संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चा आणि वाटाघाटीची बोलणी कराव्या लागतील. मात्र, येथील परिस्थिती बदलली आहे. हे मुस्लीम-बहुल राज्य आहे. ते तुमच्यासोबत (भारतासोबत) राहण्यास तयार होईल काय? तुम्ही आर्टिकल ३७० रद्द करताच तुमचे (भारताचे) जम्मू-काश्मीरसोबत असलेले सर्व संबंध संपुष्टात येतील,' असे मुफ्ती यांनी म्हटले आहे.

आर्टिकल ३७० आणि आर्टिकल ३५ (ए) रद्द करण्याची वेळ आली आहे. जम्मू-काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार देणाऱ्या तरतुदी रद्द कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत मुफ्ती यांनी हा इशारा दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details