नवी दिल्ली - मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला. यामध्ये ३१ जणांचा मृत्यू झाला. यावर नरेंद्र मोदींनी ट्विट करत गुजरातच्या वेगवेगळया भागात अवकाळी पावसामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. तसेच, आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची ग्वाही दिली. मात्र, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा उल्लेख न केल्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे.
मोदीजी, तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात; गुजरातचे नाही - कमलनाथ
'परिस्थितीवर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. आपत्तीग्रस्तांना सर्व आवश्यक मदत केली जाईल असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. त्यानंतर गुजरातमधील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली,' असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते.
'परिस्थितीवर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. आपत्तीग्रस्तांना सर्व आवश्यक मदत केली जाईल असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. त्यानंतर गुजरातमधील मृतांच्या कुटुंबीयांना त्यांनी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली,' असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. या टि्वटनंतर काँग्रेसने मोदींना ते देशाचे पंतप्रधान असल्याची जाणीव करुन दिली. मोदींनी देशाचे पंतप्रधान असल्यासारखे वर्तन करावे. पक्षपातीपणा करु नये असे मोदींना सुनावले आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि दिग्विजय सिंह यांनी मोदींच्या या टि्वटवर नाराजी व्यक्त केली. मध्य प्रदेशातही अवकाळी पाऊस आणि वादळात १० लोकांचा मृत्यू झाला आहे. पण तुमच्या संवेदना फक्त गुजरातपर्यंतच मर्यादित आहेत. भले मध्य प्रदेशात आता तुमच्या पक्षाचे सरकार नसेल पण लोक इथे सुद्धा रहातात, असे कमलनाथ यांनी आपल्या टि्वटमधून सुनावले.