बंगळुरू - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हाथरस बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले. उत्तर प्रदेश सरकार राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, योगी सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना थांबवले. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज देखील केला. आपला देश एक लोकशाहीवादी आहे की, हिटलरचा देश आहे, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला.
'योगी की रोगी माहिती नाही; मात्र, विवेकबुद्धी असेल तर राजीनामा द्यावा'
उत्तर प्रदेशातील महिला व मुली सुरक्षित नाहीत. ते 'योगी' आहेत की 'रोगी' हे मला माहिती नाही. मात्र, त्यांच्याकडे विवेकबुद्धी असेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा, असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
योगींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. उत्तर प्रदेशातील महिला व मुली सुरक्षित नाहीत. ते 'योगी' आहेत की 'रोगी' हे मला माहिती नाही. योगी सरकारने भारताची समृद्ध संस्कृती, मूल्ये आणि परंपरा नष्ट केल्या आहेत. अशा भयंकर गुन्ह्यांनंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पात्र नाहीत. त्यांच्याकडे विवेकबुद्धी असेल तर, त्यांनी राजीनामा द्यावा, असे सिद्धरामय्या म्हणाले.
तथापि, कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत उत्तर प्रदेशात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हाथरस, बलरामपूर जिल्ह्यातील बलात्काराच्या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्ष आक्रमक झाले असून योगी आदित्यनाथ सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. आज समाजवादी पक्षाचे नेते आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. उत्तर प्रदेशात जंगलराज पसरल्याचा आरोप काँग्रस नेत्यांनी केला आहे.