महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सौदीच्या दोन विमानतळांवर हौथी बंडखोरांचे पुन्हा ड्रोन हल्ले - attack

हौथी संघटनेने पुन्हा एकदा शनिवारी सौदी अरबमधील दोन विमानतळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला आहे.

सौदीच्या दोन विमानतळांवर हौथी बंडखोरांचे पुन्हा ड्रोन हल्ले

By

Published : Jul 7, 2019, 10:39 AM IST

साना -गेल्या काही दिवसांपासून येमेनमधील हौथी बंडखोरांनी सौदी अरेबियाच्या विमानतळांवरील हवाई तसेच ड्रोन हल्ले वाढविले आहेत. हौथी संघटनेने पुन्हा एकदा शनीवारी सौदी अरबमधील दोन विमानतळांवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला आहे. जीझान आणि अभा विमानतळांवर हल्ला केल्याची माहिती हौथी सेनाच्या प्रवक्त्याने दिली आहे.


हौथी संघटनेने केलेल्या या हल्ल्यावर सौदी अरबने कोणत्याच प्रकारचे उत्तर दिलेले नाही. सौदी अरबमधील दक्षिण भागांवर हल्ला करण्यासाठी हौथी ड्रोनचा वापर करत आहेत.


गेल्या महिण्यात याच प्रकारच्या झालेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. 12 जुन रोजी येमनमधील हौथी विद्रोहींनी अरबमधील एका विमानतळावर रॉकेटने हल्ला केला होता. यामध्ये 26 नागरिक जखमी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details