महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कमल हसन म्हणतो, ‘हिंदू’ शब्द मुघलांच्या आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता! - indian word

मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख आणि दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन म्हणतात, शैव, वैष्णव पंथियांनी किंवा कुणीही हिंदू या शब्दाचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये केलेला नाही, असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

कमल हसन

By

Published : May 18, 2019, 4:11 PM IST

चेन्नई - 'हिंदू' हा शब्द मुघल आणि परकीयांच्या आक्रमणांपूर्वी अस्तित्त्वातच नव्हता, असे वक्तव्य दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन यांनी केले आहे. हिंदू' ही परकीयांनी भारतीयांना त्यांच्या सोयीसाठी दिलेली ओळख आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यापूर्वी 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे होते,' असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे वादाला तोंड फुटले होते.


'याआधी भारत विविध संप्रदायांमध्ये विखुरलेला होता. त्यांच्यामध्ये 'देश' अशी भावना नव्हती. येथे आलेल्या परकीयांनी त्यांना 'हिंदू' ही ओळख दिली. मुळात 'हिंदू' हा धर्मच नाही. 'हिंदू' या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही, असे म्हटले आहे,' असे कमल यांनी तमीळ भाषेत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


याआधी 'स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता. त्याचे नाव नथुराम गोडसे,' असे वक्तव्य केले होते. यामुळे झालेल्या वादानंतर भोपळ येथील भाजप उमेदवार आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी 'नथुराम गोडसे देशभक्त' असल्याचे म्हटल्याने पुन्हा वाद वाढला होता. त्यानंतर कमल हसन यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचे सांगत सारवासारव केली होती. आता त्यांनी हिंदू हा शब्द मुघलांच्या, परकीयांच्या आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता, असे म्हटले आहे.


या ट्विटमध्ये कमल यांनी 'हिंदू' हा शब्द विदेशी हल्लेखोरांनी आणि मुघलांनी दिला आहे. त्या शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपण 'भारतीय' असेच संबोधन केले पाहिजे, असेही मत त्यांनी नोंदवले आहे. 'हिंदू' हा शब्द धर्मासाठी वापरणे गैर आहे, आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे असेही कमल यांनी म्हटले आहे.

मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख आणि दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन म्हणतात, शैव, वैष्णव पंथियांनी किंवा कुणीही हिंदू या शब्दाचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये केलेला नाही, असे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details