महाराष्ट्र

maharashtra

अमित शाह रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शशी थरुर यांच्याकडून 'हा' प्रश्न उपस्थित

By

Published : Aug 3, 2020, 2:53 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाल्याची रविवारी माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. 

शशी थरुर
शशी थरुर

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोरोनावरील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. यावरून काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. गृहमंत्री हे एम्स या सरकारी रुग्णालयात का दाखल झाले नाहीत, असा प्रश्न थरुर यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शशी थरुर यांनी ट्विट करत म्हटले, खरे आहे. आपले केंद्रीय मंत्री आजारी असताना एम्सची निवड करत नाहीत, हे आश्चर्य आहे. मात्र, जवळील राज्यात असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोनाची लागण झाल्याची रविवारी माहिती दिली. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर कोरोना चाचणी केली होती, असे शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. जे लोक संपर्कात आले आहेत, त्यांनी काही दिवस विलगीकरणात राहावे, असे शाह यांनी आवाहन केले आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची चाचणी करून घ्यावे, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी आवाहन केले आहे. त्यांनी तब्येत चांगली असल्याचेही ट्विटमध्ये म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details