महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

शर्मनाक! महिलेला डायन म्हणत नातेवाईकांनी केली मारहाण, आरोपी फरार - मारहाण

आरोपी महिलेला म्हणाले, तु घरातील लोकांना खात आहेस. कधी मांजर बनून येते, तर कधी कुत्रे बनून येते. तु येथे राहत असलेल्या सर्वांना बर्बाद करत आहेस. यामुळे तुला हे गाव सोडावे लागेल. तु गाव सोडले नाहीतर, तुला तुझा जीव गमवावा लागेल.

झारखंड

By

Published : Jun 28, 2019, 9:59 PM IST

रामगढ- झारखंड राज्यातील रामगढ जिल्ह्यातील कैथा गावात लाजीरवाणी घटना घडली आहे. नातेवाईकांनी महिलेला डायन म्हणत मारहाण करताना तिला विष्ठा खाऊ घातली. यानंतर, तिला गाव सोडून जा, अशी धमकी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री गावातील ३ व्यक्ती लोचन महतो, रुपलाल महतो, आनंद महतो यांच्यासोबत २ महिलेच्या घरी गेल्या. दरवाजा उघडताच डायन म्हणत ५ जणांनी मिळून महिलेला बेदम मारहाण केली. मारहाण करताना ५ जणांनी मिळून महिलेला विष्ठा खाऊ घातली. यादरम्यान आरोपी महिलेला म्हणाले, तु घरातील लोकांना खात आहेस. कधी मांजर बनून येते, तर कधी कुत्रे बनून येते. तु येथे राहत असलेल्या सर्वांना बर्बाद करत आहेस. यामुळे तुला हे गाव सोडावे लागेल. तु गाव सोडले नाहीतर, तुला तुझा जीव गमवावा लागेल.

पीडित महिला म्हणाली, सर्व आरोपी माझे नातेवाईक आहेत. माझ्या नावावरील जमीन त्यांना हवी आहे. त्यामुळे मला डायन म्हणत ते असले प्रकार करत आहेत.

रामगढ पोलिसांनी यावर कारवाई करताना भा.द.वि ३२३, ३४१, ५०६ नुसार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. परंतु, आतापर्यंत एकही आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details