महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महिला पोलिस अधिकाऱ्याची 'आयकॉनिक पर्सनॅलिटी पुरस्कारा'साठी निवड

मध्यप्रदेश राज्यातील इंदौर शहरात गेल्या वर्षी कचरा पेटीत सापडलेल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक अनिला पाराशर यांनी स्तनपान करून जीवनदान दिले होते. या घटनेचे वर्णन अनिला पाराशर यांनी रविवारी सांगितले. या कामगिरीसाठी पाराशर यांना आयकॉनिक पर्सनॅलिटी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

पोलीस उपनिरीक्षक अनिला पाराशर

By

Published : Jul 22, 2019, 12:02 PM IST

इंदौर - मध्यप्रदेश राज्यातील इंदौर शहरात गेल्या वर्षी कचरा पेटीत सापडलेल्या मुलीला पोलीस उपनिरीक्षक अनिला पाराशर यांनी स्तनपान करून जीवनदान दिले होते. या घटनेचे वर्णन अनिला पाराशर यांनी रविवारी सांगितले. या कामगिरीसाठी पाराशर यांना 'आयकॉनिक पर्सनॅलिटी पुरस्कारा'ने गौरविण्यात येणार आहे. त्यांना हा पुरस्कार त्या येत्या १८ ऑगस्ट रोजी, नवी दिल्लीतील लालपत भवन ऑटिटोरीअम येथे प्रदान करण्यात येणार आहे.

माध्यमांसोबत बोलताना पाराशर म्हणाल्या की, गेल्या वर्षी माझी पोलीस उपनिरीक्षक म्हणून किशनगंज पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली होती. २ ऑगस्ट २०१८ रोजी, मला १०० नंबर वरून कॉल आला आणि एक शिशू कचरापेटीमध्ये सापडल्याचे सांगण्यात आले. मी तिथे पोहोचल्यावर त्या शिशूला घेतले. ती २ वर्षांची लहान मुलगी होती. ती सतत रडत असल्यामुळे आणि भूकेने तिचा गळा लाल झाला होता.

यानंतर लगेच मी तिला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेले. मात्र, ते बाळ खूप जास्त प्रमाणात रडायला लागले होते. हे पाहून मी लगेच तिला स्तनपान सुरू केल्याचे अनिला यांनी सांगितले. नंतर डॉक्टर आल्यावर त्यांनी मला सांगितले की, या अवस्थेमध्ये या अर्भकाला स्तनपान करणे अत्यावश्यक आहे, नाहीतर हिचा जीव जाईल.

या कामगिरीसाठी पोलीस उपनिरीक्षक अनिला पाराशर यांना आयकॉनिक पर्सनॅलिटी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्या येत्या १८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीतील लालपत भवन ऑटिटोरीअम येथे प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी निवड झालेल्या त्या राज्यातील एकमेव महिला पोलीस अधिकारी आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details