साहिबगंज (झारखंड) - नगर पोलिस ठाण्यांतर्गत झेविअर्स स्कूल जवळील नवीन टोला परिसरात पहाटे एका बाईंनी दुसऱया मजल्यावरून एक-एक करून पाच मुलांना खाली फेकले. या घटनेत एका मुलाची प्रकृती गंभीर असून बाकी चार मुले जखमी आहेत.
साहिबगंजमध्ये महिलेने पाच मुलांना दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले - साहिबगंज ताज्या बातम्या
साहिबगंजच्या नया टोला परिसरात एका महिलेने पाच मुलांना दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकल्याची धक्कादायक घटना झारखंड येथील साहिबगंज येथे घडली आहे.
साहिबगंजमध्ये महिलेने पाच मुलांना दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले
या महिलेचे मानसिक संतुलन ठीक नसून ती बर्याच वेळा घरून पळाली आहे. त्यानंतर कुटुंबियांनी तिला घरी आणले. आज पहाटे सात वाजता त्या महिलेने घरातील सर्व मुलांना दुसऱया मजल्यावर घेऊन गेली. त्यानंतर तिने एक-एक करत मुलांना खाली फेकले. पहिल्या मुलाला टाकल्यानंतर उपस्थितांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणावर घरातील मंडळी काहीही बोलायला तयार नाही.