तिरुवनंतपूरम- देशभरात बलात्काराच्या अनेक घटना घडत आहेत. हा अत्याचार कधी अनोळखी व्यक्तीकडून होतो, तर कधी ओळखीच्या व्यक्तीकडून होतो. ओळखीच्या व्यक्तीकडून झालेला अत्याचार हा अधिक हादरा देणारा ठरत असावा. केरळमधील तिरुवनंतपूरम येथे असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काडिनामकुलम येथे मित्रांनीच आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक! मित्राच्या पत्नीवर मित्रांकडून सामूहिक बलात्कार - Kerala physically abuse news
केरळमधील तिरुवनंतपूरम येथे मित्रांनीच आपल्या मित्राच्या पत्नीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी रात्री 8 वाजता ही अत्याचाराची घटना घडल्याची माहिती आहे. कनियापूरममधील रहिवासी महिला पुथुकुरीची येथे तिच्या पतीच्या मित्राच्या घरी गेली होती. त्यावेळी सर्व जण तिथे दारू पार्टी करत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी महिलेला दारू पिण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.
दरम्यान पोलिसांनी महिलेला तालुका रुग्णालयात हलविले. या गुन्ह्यात पतीचादेखील सहभाग असू शकतो, असा संशय आहे. चौकशीसाठी पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असून पोलीस पुढील चौकशी करत आहेत.