नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना संकटाने थैमान घातले असून भारतामध्ये रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक स्थलांतरीत कामगार देशातील विविध भागामध्ये अडकून पडले आहेत. त्यांना घरी सोडण्यासाठी सरकारने श्रमिक रेल्वे सुरू केल्या आहेत. मात्र, लुधियाना येथून अकबरपूर पोहोचलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये एका 55 वर्षीय प्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे.
श्रमिक रेल्वेमध्ये 55 वर्षीय महिलेचा मृत्यू, 75 जणांना केले क्वारंटाईन - श्रमिक रेल्वेमध्ये मृत्यू
लुधियाना येथून अकबरपूर पोहोचलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये एका 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
woman died in train
महिलेच्या मृत्यूनंतर रेल्वेमधील संबधित डब्ब्यातील 75 कामगारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेत त्यांचे कोरोना चाचणी करण्यासाठी नमुने रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना घरी पाठवण्यात येणार आहे.
आज श्रमिक रेल्वे लुधियाना येथून प्रवाशांना घेऊन अकबरपूर येथे पोहोचली. रेल्वेमध्ये 1 हजार 338 प्रवासी होते. दरम्यान महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह अंबाला रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आला आहे.