महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

वैद्यकीय सुविधा वेळेवर न मिळाल्याने महिलेची रस्त्यावरच प्रसुती - भोपाळ

बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इंदौर-इच्छापूर मार्गावरील दापोरा-चापोरा गावादरम्यान एक महिला रस्त्यावरच प्रसुती झाल्याची घटना घडली आहे.

स्वास्थ केंद्र

By

Published : Aug 24, 2019, 2:08 PM IST

भोपाळ- बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील इंदौर-इच्छापूर मार्गावरील दापोरा-चापोरा गावादरम्यान एक महिलेची रस्त्यावरच प्रसुती झाल्याची घटना घडली आहे. कमलबाई (रा. मोरझिरा), असे या महिलेचे नाव आहे.

महिलेची रस्त्यावरच प्रसुती

तिला कुटुंबातील व्यक्तींनी लागलीच बोरसल येथील स्वास्थ्य केंद्रावर घेऊन गेले. परंतु, त्या ठिकाणी परिचारीका नसल्यामुळे तिला शाहपूर येथील रुग्णालयाला घेऊन जात होते. त्यावेळी वाटेतच तिची प्रसुती झाली. काल रात्री मोरझीला गावातील आशाशी संपर्क साधला होता. परंतु, ती घरी आली नसल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. महिला आणि बाळ सध्या शाहपूर येथील स्वास्थ्य केंद्रात असून दोघेही सुखरूप आहेत.

१०८ रूग्णवाहीका आलीच नाही -

कमलबाई या महिलेला प्रसव वेदना असह्य झाल्यानंतर कुटुंबीयांनी १०८ क्रमांकावर संपर्क साधून रुग्णवाहीकेची मागणी केली. परंतु, खूप वेळ झाला तरीही रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे त्या महिलेला दुचाकीवरून रूग्णालयात नेण्यात येत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details