लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बदायुं जिल्ह्यातील एका महिलेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखळ झाले. यानंतर तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुगणालयात पाठवले असून पुढील करवाई सुरू आहे.
विवाहितेची दोन मुलांसोबत आत्महत्या; सासरी छळ होत असल्याचा आरोप - उत्तर प्रदेश विवाहितेची आत्महत्या
बदायुं जिल्ह्यातील एका महिलेने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून दोन मुलांसह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेने दोन मुलांना विष पाजले; तसेच स्वत:चे देखील जीवन संपवले.
बदायुं जिल्ह्यातील एका महिलेने सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून दोन मुलांसह आत्महत्या केली आहे.
गृहकलहातून या महिलेने आत्महत्या करण्याचे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित महिलेने दोन्ही मुलांना विष पाजून नंतर स्वत:चे जीवन संपवले.
एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या भावाने सासरच्या लोकांवर छळाचा आरोप केला आहे. 2012 साली लग्न झाल्यानंतर सतत हुंड्याची मागणी करत असल्याचे त्याने सांगितले. तसेच यासाठी तिला मारहाण होत असल्याचे देखील त्याने नमूद केले आहे.