लखनऊ -विधानसभेसमोर एका महिलेने स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तिची प्रकृती गंभीर असून तिला शिव हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
लखनऊ विधानसभेसमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न - attempt to suicide
सासरच्या मंडळींच्या अत्याचाराला कंटाळून एका महिलेने विधानसभेसमोर स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
महराजगंजमध्ये राहणाऱ्या अखिलेश तिवारी याच्याशी तिचा विवाह झाला होता. काही दिवसांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर या महिलेने धर्म परिवर्तन करून आसिफ नावाच्या एका युवकाशी तिने लग्न केले. लग्नानंतर आसिफ सऊदीला रवाना झाला. त्यानंतर आसिफच्या घरच्यांनी या महिलेवर अत्याचार करणे सुरू केले. या अत्याचाराला कंटाळून या महिलेने विधानसभेसमोर स्वत:वर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी लगेच घटनास्थळी पोहोचून या महिलेले रूग्णालयात भर्ती केले. सद्यस्थितीत तीची प्रकृती गंभीर आहे.