महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणार नाही - गोवा काँग्रेस - गोवा काँग्रेस

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर नव्याने सत्तेवर आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार नाही, तर ते आपोआपच कोसळेल. कारण यासाठी केलेली जुळवाजुळव पाहता, ते होणार हे निश्चित आहे, असे मत गोवा विधानसभेचे विरोध पक्षनेते बाबू कवळेकर यांनी आज विश्वासदर्शक ठरावानंतर व्यक्त केले.

पणजी

By

Published : Mar 20, 2019, 9:30 PM IST

Updated : Mar 20, 2019, 11:01 PM IST

पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर नव्याने सत्तेवर आलेले सरकार पाडण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार नाही, तर ते आपोआपच कोसळेल. कारण यासाठी केलेली जुळवाजुळव पाहता, ते होणार हे निश्चित आहे, असे मत गोवा विधानसभेचे विरोध पक्षनेते बाबू कवळेकर यांनी आज विश्वासदर्शक ठरावानंतर व्यक्त केले.

पणजी

कवळेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या अंत्यविधीला आलेल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सरकार स्थापनेसाठी रात्रीची सौदेबाजी करत आघाडी केली. त्याबरोबरच आघाडीतील घटकपक्ष फोडून आमदारांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न केला गेला. याला राज्यपालही जबाबदार आहेत. आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष असूनही आम्हाला संधी देण्यात आलेली नाही.

माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले, कोणत्याही मुख्यमंत्र्यांचे अथवा पंतप्रधानांचे निधन झाले तर नवे सरकार स्थापन करताना पुन्हा नवी प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेची संधी दिली गेली पाहिजे. मात्र, गोव्याच्या राज्यपाल आपले संविधानात्मक अधिकार विसरून गेल्या आहेत.

गोवा विधानसभेचे सर्वाधिक काळ सदस्य असलेले माजी मुख्यमंत्री तथा 'पर्ये'चे आमदार प्रतापसिंह राणे म्हणाले, आम्ही सर्वात मोठा पक्ष असल्याने आम्हाला प्रथम सरकार स्थापनेची संधी देणे आवश्यक होते. सध्याचे सरकार हे अल्पमतात आहे.

दरम्यान, गोव्यातील खाण व्यवसाय सुरु करण्यास आलेले अपयश लपविण्यासाठी खाणपट्ट्यातील आमदाराला मुख्यमंत्री केले आहे असे वाटते का? असे विचारले असता कवळेकर म्हणाले, खाणपट्ट्यातील मुख्यमंत्री असल्याने त्यांच्याकडून खाण अवलंबितांना मोठ्या अपेक्षा आहेत. ते हा प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देतील अशी आशा आहे.

Last Updated : Mar 20, 2019, 11:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details