'अमेरिकेनं ज्या पद्धतीनं दहशतवादाचा सामना केला, तसंच आपल्यालाही करावं लागेल' - बिपीन रावत बातमी
दहशतवाद पोसणाऱ्या देशांना राजनैतिकदृष्या एकटे पाडणं आणि 'फायनान्शिअल टास्क फोर्स'द्वारे काळ्या यादीत समावेश करणे हे दहशतवादाशी लढण्यासाठीचे योग्य पाऊल आहे. ऑनलाईन माध्यमांमधून पसरवला जाणारा कट्टरतावाद संपवायला हवा. कट्टरतावादी विचारसरणी आपल्याला संपवावी लागेल, असे रावत म्हणाले.
सरसेनाध्यक्ष बिपीन रावत
नवी दिल्ली- 'जे देश दहशतवादाला थारा देतात त्यांना जागतिक स्तरावर एकटे पाडण्याचं आवाहन सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना केले. जोपर्यंत काही देश दहशतवादाचा पुरस्कार करत राहतील, तोपर्यंत आपल्याला दहशतवादाच्या धोक्यासोबतच राहवे लागणार आहे, जर आपल्याला दहशतवाद संपवायचा असेल, तर ज्या पद्धतीने अमेरिकेने ९/११ नंतर दहशतवाद विरोधात लढा दिला, त्या पद्धतीने आपल्यालाही लढा द्यावा लागेल, असे रावत म्हणाले.