महाराष्ट्र

maharashtra

अश्विन शर्मा यांच्या घरातून सापडल्या वन्य प्राण्यांच्या कातडी आणि इतर वस्तू

By

Published : Apr 9, 2019, 1:01 PM IST

अश्विन यांच्या घरात प्राप्तिकर विभागासह सीआरपीएफ आणि भोपाळ पोलीसही उपस्थित आहेत. प्राण्यांच्या मृत शरीरांचे जतन करून त्यापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंचा यात समावेश आहे. घरात वाघाची कातडी मिळाल्यानंतर वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले.

वन्य प्राण्यांच्या कातडी आणि इतर वस्तू

भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष अधिकारी (OSD) प्रवीण कक्कड यांचे सहकारी अश्विन शर्मा यांच्या घरी प्राप्तिकर विभागाची कारवाई सुरू आहे. या कारवाईत आज विविध वन्य प्राण्यांच्या कातडी, शिंगांपासून बनवलेल्या वस्तू तसेच, विविध प्राण्यांची शीरे सापडली आहेत. यात वाघ, चीत्ते, बारशिंगे, हरीण आदी अनेक प्राण्यांचे शीर, शिंग आणि कातड्यांपासून बनवलेल्या वस्तू आहेत.

अश्विन यांच्या घरात प्राप्तिकर विभागासह सीआरपीएफ आणि भोपाळ पोलीसही उपस्थित आहेत. प्राण्यांच्या मृत शरीरांचे जतन करून त्यापासून बनवलेल्या शोभेच्या वस्तूंचा यात समावेश आहे. हे सर्व जप्त करण्यासाठी वनविभागाला पाचारण करण्यात आले आहे. घरात वाघाची कातडी मिळाल्यानंतर वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आले.

या प्राण्यांपासून शोभेच्या वस्तू बनवण्यात आल्या आहेत - ब्लॅक बक, सांभर, वाघ, चीत्ता, हरीण, चीतळ, चिंकारा. काहींची कातडी मिळाली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details