महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'कोण म्हणतंय भाजपला हरवता येणार नाही; विरोधी पक्षांनी विश्वास ठेवावा आपण जिंकू शकतो' - बिहार निवडणूक पी. चिदंबरम

कोण म्हणतंय भाजपला हरवले जाऊ शकत नाही, असे म्हणत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी बिहारमधील विरोधी पक्षांना बळ देण्याचा प्रयत्न केला. चिदंबरम यांनी विरोधी पक्षांना आवाहन केले की, भाजपचा पराभव होऊ शकतो, आपल्याला लढावे लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा त्यांनी दाखला दिला.

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम
माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम

By

Published : Nov 1, 2020, 5:08 PM IST

Updated : Nov 1, 2020, 5:39 PM IST

नवी दिल्ली- विरोधी पक्षांनी जोरदार संघर्ष केल्यास भाजपला पराभूत करणे शक्य आहे. कोण म्हणतंय भाजपला हरवले जाऊ शकत नाही, असे म्हणत कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी बिहारमधील विरोधी पक्षांना बळ देण्याचा प्रयत्न केला. चिदंबरम यांनी विरोधी पक्षांना आवाहन केले की, भाजपचा पराभव होऊ शकतो, आपल्याला लढावे लागेल. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा त्यांनी दाखला दिला.

ट्विट करून ते म्हणाले की, कोण म्हणतंय भाजपला पराभूत करता येणार नाही. विरोधी पक्षांनी संघर्ष करत आपण जिंकणार असा विश्वास ठेवावा. बिहारच्या विधानससभेचे निकाल आपल्या बाजूने असतील. त्यांनी महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांचाही दाखल दिला.

विरोधी पक्षांनी विश्वास ठेवाव की, ते भाजपला पराभूत करू शकतात

त्यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, 2019 पासून या भागातील (बिहार) निवडणुका किंवा पोटनिवडणुकीत 381 पैकी केवळ 163 भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपला पराभूत करता येणार नाही असे कोण म्हणतंय? विरोधी पक्षांनी विश्वास ठेवाव की, ते भाजपला पराभूत करू शकतात. मला आशा आहे की हे बिहारमध्ये सिद्ध होईल.

Last Updated : Nov 1, 2020, 5:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details