जिनिव्हा - पश्चिम आफ्रिकेतील राष्ट्रांमध्ये मृत्यूचे थैमान घामणाऱ्या इबोला विरोधात जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. पश्चिम आफ्रिकेतील इबोला प्रकोप संबंधित आयएचआर आणीबाणी समितीचे अध्यक्ष रॉबर्ट स्टीफन यांनी ही घोषणा केली आहे.
'इबोला' ही जागतिक आरोग्य आणीबाणी - जागतिक आरोग्य संघटना - जागतिक आरोग्य संघटना
पश्चिम आफ्रिकेत मृत्यूचे थैमान घालणाऱ्या ईबोला रोगाची साथ सर्वत्र पसरू नये, म्हणून जागतिक आरोग्य संघटना म्हणजे ‘हू’ने (WHO) ईबोलाविरोधात ‘जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली आहे.
गेल्या ४० वर्षातली ही सर्वात मोठी आणि धोकादायक साथ आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी घोषित करण्याची ही तिसरीच वेळ आहे. याआधी २००९ मध्ये स्वाइन फ्ल्यूच्या आणि पोलिओच्या साथीच्या वेळी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. ईबोलामुळे 1600 जणांचा मृत्यू झाला आहे. ‘हू’चा आदेश मानून एबोला परसलेल्या काही देशांनी याआधीच राष्ट्रीय आपत्तीची घोषणा केली आहे. मात्र या साथीचा आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि प्रवासावर परिणाम होऊ नये यासाठी ही जागतिक आणीबाणी आहे. ईबोला ही इतिहासातील दूसरी सर्वात मोठी आपत्ती आहे. यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेकडून 'एबोला' जागतिक आणीबाणी म्हणून जाहीर करण्यात आली आहे.