महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बालाकोटमधील दहशतवादी सक्रिय; मात्र, त्यांना तोंड देण्यास लष्कर समर्थ - राजनाथ सिंह - Pulwama

पाकिस्तान बालाकोटमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच पाकिस्तानकडून भारतात 500 दहशतवादी पाठवण्याच्या प्रयत्न होत आहे, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली.

राजनाथ सिंह

By

Published : Sep 25, 2019, 5:31 PM IST

Updated : Sep 25, 2019, 5:37 PM IST

चेन्नई - बालाकोटमधील दहशतवादी सक्रिय झाले असले, तरी कोणत्याही प्रकारच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपले जवान हे समर्थ असल्याचे राजनाथ सिंह यांनी बुधवारी स्पष्ट केले. चेन्नईमध्ये एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

बालाकोटमधील दहशतवादी सक्रिय; मात्र त्यांना तोंड देण्यास लष्कर समर्थ : राजनाथ सिंह

पाकिस्तान बालाकोटमध्ये पुन्हा सक्रिय झाला आहे. तसेच पाकिस्तानकडून भारतात 500 दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न होत आहे, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यावर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : जैश -ए- मोहम्मदचा वायू सेनेच्या तळांवर हल्ल्याचा कट, हाय अलर्ट जारी

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामामधील भारताच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये सीपीआरएफचे ४० जवान शहीद झाले होते. याचे प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने, २६ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या बालाकोटमधील 'जैश'च्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर एअर स्ट्राईक' केला होता.

हेही वाचा : लष्कर भरतीचे स्वप्न राहिले अपूर्णच.. ऑटोला टँकरने चिरडल्याने ९ तरुणांचा मृत्यू

Last Updated : Sep 25, 2019, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details