महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

टीएमसीची रॅली म्हणजे 'दीदींची सर्कस', भाजप नेते घोष यांच्या वक्तव्यानंतर गुन्हा दाखल - dilip ghosh

'तृणमूलची रॅली फ्लॉप होणार असून त्यामध्ये कोणी जाणार नाही. त्यांना काहीतरी कारण हवे असल्यानेच त्यांनी माझ्यावर तक्रार दाखल केली आहे. अशा १० तक्रारी दाखल केल्या तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही,' असे घोष म्हणाले.

दिलीप घोष

By

Published : Jul 21, 2019, 3:32 PM IST

कोलकाता -तृणमूल काँग्रेसतर्फे वार्षिक रॅली काढण्यात येत आहे. पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख दिलीप घोष यांनी टीएमसीची ही रॅली म्हणजे 'दीदींची सर्कस' असल्याचे म्हटले आहे. ही एक शोक सभा असेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

टीएमसीतर्फे हा दिवस कोलकात्यामध्ये १९९३मध्ये पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या लोकांची आठवण म्हणून साजरा केला जातो. लोकसभा निवडणुकीत ममता साम्राज्याला बसलेल्या मोठ्या झटक्यानंतरचा हा पहिलाच मेगा शो असल्याने हा तृणमूलच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

'येथे सर्व लोक दीदींची नाटकबाजी आणि सर्कस पहायला गेले होते. उद्याही कोणी ही सर्कस पहायला जाणार आहे का?,' असे घोष यांनी म्हटले आहे. सोबतच त्यांनी ही झेंड्यांशिवाय कसली रॅली आहे, असा प्रश्नही केला. निवडणुकीत झालेल्या पराजयाची ही शोकसभा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. तृणमूल विजय साजरा करू शकत नसल्याने ही सभा घेतल्याचेही ते म्हणाले. जनतेने रोड शो करणाऱ्या नेत्यांना मागील ७-८ वर्षांत लुटलेले त्यांचे पैसेही परत मागितले पाहिजेत, असेही घोष म्हणाले.

'तृणमूलची रॅली फ्लॉप होणार असून त्यामध्ये कोणी जाणार नाही. त्यांना काहीतरी कारण हवे असल्यानेच त्यांनी माझ्यावर तक्रार दाखल केली आहे. अशा १० तक्रारी दाखल केल्या तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही,' असे घोष म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details