महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजपकडून १२ तास बंगाल बंदची हाक; काळा दिवस पाळणार

बशिरहाट येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवले, परिणामी संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची रविवारी रात्री तयारी केली होती.

By

Published : Jun 9, 2019, 11:53 PM IST

बंगाल बंदची हाक

बशिरहाट - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये टीएमसी-भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळताना दिसत आहे. भाजप व टीएमसी कार्यकर्ते यांच्यात हाणामारीच्या घटना वाढल्या आहेत. बशिरहाट येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवले. यानंतर तणाव निर्माण झाला होता.

बंगालच्या २४ परगना येथे शनिवारी सायंकाळी उशिरा या दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. ज्यात कथितरित्या आठजण मारले गेल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय अनेकजण जखमीदेखील झालेले आहेत. रविवारी देखील दिवसभर या भागात तणावाचे वातावरण होते. शनिवारी भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराच्या मुद्यावरून स्थानिक भाजप नेते व राज्य पोलिसांमध्ये वाद होऊन वातावरण अधिकच तापले. यामुळे बशिरहाट येथे अंत्यसंस्कारासाठी पक्ष कार्यालयात नेण्यात येणारे भाजप कार्यकर्त्यांचे मृतदेह मध्येच अडवले, परिणामी संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यातच या दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची रविवारी रात्री तयारी केली होती.

या घटनेनंतर पोलिसांवर मनमानी केल्याचा आरोप करण्यात आला असून, भाजपच्या वतीने सोमवारी बशिरहाटसह संपूर्ण बंगालमध्ये १२ तासांचा बंद पुकारण्यात आलेला आहे. शिवाय भाजप हा दिवस काळा दिवस म्हणूही पाळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details