महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

फक्त देशाच्या हितासाठी! दडपण असतानाही सीएए, कलम ३७० सारख्या निर्णयांवर आम्ही ठाम

काश्मीरमधील ३७० कलम हटवणे असो, किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा असो, हे निर्णय देशाच्या हितासाठी होते.

pm modi
पंतप्रधान मोदी

By

Published : Feb 16, 2020, 4:42 PM IST

लखनौ - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात पेटलेले आंदोलन शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. अनेक राज्यांचाही हा वादग्रस्त कायदा लागू करण्यास विरोध आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी सरकारची भूमिका मांडली आहे. सीएएबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. हा निर्णय देशाच्या हिताचे असल्याचे मोदी म्हणाले. उत्तरप्रदेशातील वाराणसी येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

काश्मीरमधील ३७० कलम हटवणे असो, किंवा नागरिकत्व सुधारणा कायदा असो, हे निर्णय देशाच्या हितासाठी होते. दडपण असतानाही आम्ही आमच्या निर्णयावर ठाम राहिलो आणि ठाम राहणार आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले. अनेक वर्षांपासून हे निर्णय घेण्याची जनता वाट पाहत होती, आम्ही यावर निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना मोदींनी सीएए विरोधी आंदोलन म्हणजे देशात गोंधळाची स्थिती निर्माण करण्याचा प्रकार असल्याचे म्हटले होते. सगळीकडे हिंसा, आंदोलन पसरवले जात आहे. वोटबँक राखण्यासाठी विरोधकांकडून हे केले जात आहे, असा आरोप मोदींनी केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details