महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मोदी कायम पाकिस्तानबद्दल बोलतात, ते काय पाकिस्तानातचे राजदूत आहेत का'? - नागरिकत्व सुधारणा कायदा

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोदींवर निशाणा साधला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

mamta banarji
संग्रहित छायाचित्र

By

Published : Jan 3, 2020, 4:44 PM IST

कोलकाता - नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ममता बॅनर्जींनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी कायम भारताची तुलना पाकिस्तानशी करतात. त्यांनी भारताबद्दल बोलायला पाहिजे त्याऐवजी ते दिवसभर पाकिस्तानबद्दल बोलतात. जसे काय मोदी पाकिस्तानचे राजदूत आहेत, असे म्हणत ममता बॅनर्जींनी मोदींवर निशाणा साधला.

पाकिस्तानबद्दलची चर्चा पाकिस्तान करेल, आपण हिंदुस्तानबद्दल बोलू. भारत आमची मातृभूमी आहे. इतक्या वर्षानंतर पुन्हा आम्हाला नागरिकता सिद्ध करावी लागेल. गृहमंत्री म्हणतात देशात एनआरसी लागू होईल, मात्र, पंतप्रधान म्हणतात याबद्दल काहीही माहीत नाही, असे म्हणत त्यांनी मोदींना लक्ष्य केले.
पश्चिम बंगालमधील सीलीगुडी येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू आहे, यावेळी ममता बॅनर्जी बोलत होत्या. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details