प्रयागराज -उत्तर प्रदेशमध्ये थाटामाटामध्ये चक्क एका श्वानाचे लग्न लावले आहे. या अनोख्या लग्नात 500 वऱ्हाडी उपस्थित होते. श्वानाचे हिंदू पद्धतीने विधीपूर्वक लग्न लावले आहे.
तुम्ही श्वानाचा लग्न सोहळा पाहिलाय? उत्तर प्रदेशमध्ये थाटामाटात लावले चक्क एका श्वानाचे लग्न - एका श्वानाचे लग्न
उत्तर प्रदेशमध्ये थाटामाटात चक्क एका श्वानाचे लग्न लावले आहे. या अनोख्या लग्नात 500 वऱ्हाडी उपस्थित होते. श्वानाचे हिंदू पद्धतीने विधीपूर्वक लग्न लावले आहे.
या अनोख्या लग्नातील श्वान नवरदेवाने लग्नाचा फेटा घातला असून श्वान नवरीने लग्नामध्ये वधूचा पोशाख परिधान केला आहे. या अनोख्या लग्नातील अनोख्या वरातीत बॅडही वाजत होता. उपस्थितांनी वधूच्या बाजूने वऱ्हाडीचे मनापासून स्वागत केले आणि त्यांना खाद्यपदार्थांची सेवा दिली. लग्नामध्ये ज्याप्रमाणे नवरीची पाठवणी करतात. त्याचप्रमाणे श्वान नवरीची पाठवणी करण्यात आली. हे लग्न गावकऱ्यांनी निधी गोळा करून लावले आहे. मात्र, या लग्नामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.