बंगळुरू- नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस कधी लाठीचार्ज, कधी अश्रूधुराचा मारा तर कधी गोळीबारही करत आहेत. मात्र, बंगळुरूचे पोलीस उपायुक्त चेतन सिंह राठोड यांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी माईकच्या सहाय्याने, मोठ्या आवाजात राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवात करताच, आंदोलकांनीही जागीच स्तब्ध उभे राहून त्यांना साथ दिली.
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत! - बंगळुरू आंदोलन राष्ट्रगीत
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस कधी लाठीचार्ज, कधी अश्रूधुराचा मारा तर कधी गोळीबारही करत आहेत. मात्र, बंगळुरूचे पोलीस उपायुक्त चेतन सिंह राठोड यांनी आंदोलकांना थांबवण्यासाठी वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी माईकच्या सहाय्याने, मोठ्या आवाजात राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. त्यांनी सुरुवात करताच, आंदोलकांनीही जागीच स्तब्ध उभे राहून त्यांना साथ दिली.

आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!
आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलीस उपायुक्ताने गायले राष्ट्रगीत!
दरम्यान, मंगळुरूमधील आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये काल दोन आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर, मंगळुरू आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.
हेही वाचा : #CAA : जामिया मिलिया विद्यापीठाची वेबसाईट हॅक